नागपूर : शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या सदर-छावणी परीसरात हॉटेल सिटीस्केप येथे सुरु असलेल्या सेक्स रॅकेटवर गुन्हे शाखेच्या एएचटीयू आणि युनीट दोनच्या पथकाने छापा घातला. स्पा आणि मसाजच्या नावावर याठिकाणी देहव्यापार सुरु असल्याची गुप्त माहिती पोलिसांना लागली होती. या छापेमारीत कोलकाता, मुंबई- दिल्लीतील ६ मुलींची सुटका सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी हॉटेलच्या मालकासह चौघांवर गुन्हे दाखल केले .
माहितीनुसार, आरोपी ओम ऊर्फ अविनाश कदम याने छावणीत सिटीस्केप नावाने हॉटेल उघडले होते. मात्र, व्यवसाय व्यवस्थित होत नसल्यामुळे कदम यांनी स्पा आणि मसाजच्या नावावर सेक्स रॅकेट सुरु केले. त्यासाठी मुंबई, दिल्ली, कोलकाता, उत्तरप्रदेश, मनिपूर, आसाम या शहरातील अल्पवयीन मुली आणि महिलांना देहव्यापार करण्यासाठी नागपुरात आणले गेले होते.
देहव्यापार चालविण्यासाठी कमलेश गजानन कटकमवाड (४२, गुरुकुंजनगर, मानेवाडा), पिंकी ऊर्फ दिया, प्रदीपकुमार ठाकूर कुशवाह (२८, सलीमपूर-उत्तरप्रदेश) यांना ठेवण्यात आले होते. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. युनीट दोनचे प्रमुख बाबुराव राऊत, एएचटीयूच्या प्रमुख रेखा संकपाळ, गणेश पवार, दीपक बिंदाने, मनिष पराये, कमलेश गणेर, सुरेश तेलेवार, अश्विनी खोडपेवार, शरीफ शेख यांनी सापळा रचला. दोन बनावट ग्राहक हॉटेलमध्ये पाठवले. त्यांनी मुलींची मागणी केली. पिंकी ऊर्फ दिया हिने लगेच सहा मुली व महिलांना रांगेत उभे केले.त्यानंतर पोलिसांनी तडकाफडकी कारवाई केली.
मनिपूर राज्यातून देहविक्री करण्यासाठी नागपुरात आणण्यात आलेली. १६ वर्षीय मुलगी मूकबधीर आहे. तिला बळजबरीने देहव्यापार करावा लागत होता. तीन दिवसांपूर्वी त्या मुलीशी शारीरिक संबंध ठेवलेल्या ग्राहकाला तिने पेनाने चिठ्ठीवर लिहून दलदलीतून सुटका करण्याची विनंती केली. त्या ग्राहकाला दया आली. त्याने त्या मुलीला सोडविण्यासाठी प्रयत्न केला.त्याच ग्राहकांने पोलिसांना हॉटेल सिटीस्केप येथे देहेव्यापार सुरु असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला.