Published On : Sat, Nov 21st, 2026
By Nagpur Today Nagpur News

गुलाबी थंडीत सोनेगाव आमराई मधे विदेशी & देशी पक्ष्याची मांदियाळी

Advertisement

नागपूर, नोव्हेंबर 19: दक्षिण – पश्चिम नागपुरातील भोंसले कालीन सोनेगाव आमराई आणि लगतचा 40 एकरातील विस्तीर्ण जंगल परिसर अनेक नागरिकांसाठी सकाळी आणि संध्याकाळी वॉलकिंग, रनींग, सायकलिंग, योगा साठी अत्यंत आवडीचे ठिकाण तर आहेच.. पण सध्या पडत असलेल्या गुलाबी थंडी मधे अनेक विदेशी आणि देशी पक्ष्यासाठी देखील अत्यंत आवडते ठिकाण बनले आहे.

सोनेगाव आमराई परिसरात भोंसलेकालीन मुरलीधर मंदिर, हनुमान मंदिर आणि पुरातन बाराव (विहीर ) तर आहेच आहे पण त्याच काळा तील मोठा मोठाले वृक्ष जसे वडाचे झाड, कडू लिंब, पिंपळ हे देखील आहेत. आणि ह्याच आमराईत नुकतेच काही परदेशीं पक्ष्याचे आगमन झालेले आहे.. सायबरिया, रशिया आणि मँगोलिया अश्या अती थंड प्रदेशातून हे पक्षी आपल्या नागपुरात (सोनेगाव आमराईत आले आहेत… असे पक्षी अभ्यासक विशाल अभ्यंकर सांगतात.

गुलाबी थंडीत सोनेगाव आमराई मधे विदेशी & देशी पक्ष्याची मांदियाळी
Brown Hawk Owl / Brown Boobook
मराठी नाव : बहिरी घुबड
हा पक्षी भारतात प्रामुख्याने जंगल भागात आढळतो…

गुलाबी थंडीत सोनेगाव आमराई मधे विदेशी & देशी पक्ष्याची मांदियाळी
Taiga Flycatcher” नावाचा हा छोटासा पक्षी रशिया, सायबेरिया आणि युरोपीय देशांतून तब्बल ३५०० किलोमीटरचा प्रवास करून आपल्या नागपूरातील सोनेगाव आमराई मध्ये आलेला आहे.

गुलाबी थंडीत सोनेगाव आमराई मधे विदेशी & देशी पक्ष्याची मांदियाळी
Blue – capped Rock Thrush मराठी नाव: निळ्या टोपीचा कस्तुर: हा पक्षी प्रामुख्याने उत्तर भारतात हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर अणि उत्तराखंड मध्ये आढळतो.हे थंडी च्या मोसमात भारतात दक्षिणेकडे केरळ राज्यामधे स्थलांतरण करीत असतात थंडी संपली की परत दक्षिण भारत म्हणुन उत्तर भारत हिमालयाच्या दिशेने परतीचा प्रवास करीत असतात..परतीच्या प्रवासात वाटेत मध्य भारतात नागपूर शहरात “आमराई” मध्ये काही दिवस थांबा घेतात .

Advertisement

गुलाबी थंडीत सोनेगाव आमराई मधे विदेशी & देशी पक्ष्याची मांदियाळी
Red-breasted flycatcher
आमराईत हिवाळ्याच्या मोसमात स्थलांतरण करणारे विदेशी पक्षी: ह पक्षी भारतात युरोप, रशिया, सायबेरिया, मंगोलिया या भागातून येत असतात.
परदेशीं पक्ष्याप्रमाणे आमराई मधे बरेच स्थानिक पक्षी देखील पक्षी अभ्यासक / निरीक्षक ह्यांनी टिपलेले आहे जसे…

गुलाबी थंडीत सोनेगाव आमराई मधे विदेशी & देशी पक्ष्याची मांदियाळी
Bird : Grey Hornbill मराठी नाव : धनेश

गुलाबी थंडीत सोनेगाव आमराई मधे विदेशी & देशी पक्ष्याची मांदियाळी
Bird : Orange Headed Thrush मराठी नाव : नारिंगी डोक्याचा कस्तुर

गुलाबी थंडीत सोनेगाव आमराई मधे विदेशी & देशी पक्ष्याची मांदियाळी
Bird : Asian Paradise Flycatcher मराठी नाव: स्वर्गीय नर्तक आणि

गुलाबी थंडीत सोनेगाव आमराई मधे विदेशी & देशी पक्ष्याची मांदियाळी
Bird : Common Hawk चुककू मराठी नाव: पावश्या… तसेच आमराईतील पुरातन विहिरीजवळ तर पोपटची दररोज सकाळी शाळा च भरते..
सोनेगाव आमराईत हिरव्यागार, निसर्गरम्य आणि शांत वातावरणात अश्या परदेशीं आणि स्थानिक पक्षी पाहणे हे विलक्षण अनुभव असतात. सोनेगाव आमराईत असे निरनिराळे प्रजातीचे पक्षी येतात थांबा घेतात ते ही दरवर्षी तेव्हा अश्या या नैसर्गिक भोसलेकालीन सोनेगाव आमराईचे चे रक्षण आणि जतन करने आवश्यक आहेच तसेच कचरामुक्त ठेवणे आवश्यक आहे असे आवाहन WeLove सोनेगाव आमराई ग्रुप चे प्रवर्तक सचिनभाऊ द्रवेकर ह्यांनी नागरिकांना केले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.