Advertisement
नागपूर : दहावीच्या अभ्यासक्रमातून लोकशाहीचा धडा हद्दपार करण्यात आला आहे. एनसीईआरटीने अभ्यासक्रम आणि पुस्तकांत बदल केले असल्याचे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
तसेच दहावीच्या सायन्सच्या पुस्तकातून आवर्तन सारणी म्हणजेच पिरियॉडीक टेबलही काढून टाकण्यात आला आहे. याअगोदरही अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास, गुजरात दंगलीशी संबंधित मजकूर, नक्षलवादी चळवळीची ओळख, दलित चळवळीतील लेखकांची नावं वगळली होती. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.
तर दुसरीकडे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ‘एक राज्य एक गणवेश’ या योजनेअंतर्गत सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाची घोषणा केली होती. मात्र आता ही योजना फसत चालल्याची माहिती आहे. कारण शासनाकडून अद्याप हा निधी शाळांपर्यंत पोहोचलेला नाही.