Published On : Tue, May 12th, 2020

कामठीत जागतिक परिचारिका दिवस उत्साहात

कामठी :-आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगेल याचा जन्मदिवस 12 मे रोजी जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो याच पाश्वरभूमीवर कामठीतील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात आज हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रभारी वैद्यकीय अधिक्षिका डॉ श्रद्धा भाजीपाले यांच्या मुख्य उपस्थितीत आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ धीरज चोखान्द्रे , डॉ श्रद्धा भाजीपाले यांनी नाईटिंगेल यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला .

याप्रसंगी अधिपरीचारिका उज्वला वाघमारे,हुमने, हाजरा, शेळके , ब्रदर शेख , तसेच पानसरे, बाबुराव आदींसह समस्त परीचारिकागण व रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी