Published On : Tue, May 12th, 2020

तहसीलदार हिंगे ने 64परप्रांतीय मजुरांना केले बस ने रवाना

Advertisement

कामठी :-बिहार व छत्तीसगढ सारख्या पर राज्यातून बहुतांश मजूर महाराष्ट्रात आले होते परंतु अकस्मात कोविड-19 कोरोना च्या या वैश्विक महामारीत व लोकडोउन मुळे कित्येक मजूर महाराष्ट्रात च अडकल्याने मजुरी नाही, पैसा नाही , उपजीविकेचे कुठलेही साधन नाही त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती अशा परिस्थितीत या सर्व परप्रांतीय मजुरांना स्वतःच्या गावाला जाण्याची ओढ लागल्याने शेकडो किलोमीटर ची दिवस रात्र पायपीट करीत स्वगृह गाठणे च्या बेतात काही परप्रांतीय मजुर कामठी शहरात पोहोचताच त्यांनी तहसोलदार अरविंद हिंगे यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार हिंगे यांनी परप्रांतीय व्यक्तींना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी राज्य महामार्ग महामंडळाच्या बसेसच्या मोफत प्रवास सुविधेचा लाभ घेत मध्यप्रदेश चे 51 तर छत्तीसगढ चे 13 असे एकूण 64 परप्रांतीय मजुरांना आज कामठी बसस्थानकाहून तीन एस टी बस ने प्रवासी करून त्यांच्या मूळ गावी रवाना केले.

याप्रसंगी एस टी बस चे अधिकारी, मंडळ अधिकारी महेश कुलदिवार आदी उपस्थित होते