Published On : Thu, May 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात खळबळ; मेडिकलमध्ये ट्रान्सजेंडर रुग्णाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह!

Advertisement

नागपूर– शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) गुरुवारी सकाळी खळबळ उडाली. अमरावती जिल्ह्यातील नांदगावपेठ येथील ३५ वर्षीय ट्रान्सजेंडर राधिका मोहन जाधव हिचा संशयास्पद मृत्यू झाला. राधिका ही मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक १७ मध्ये उपचार घेत होती. सकाळी साडेसातच्या सुमारास ती बेडला बांधलेल्या पट्टीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.

माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी राधिका चालत्या रेल्वेतून खाली पडली होती. या भीषण अपघातात तिचे दोन्ही पाय गमवावे लागले होते. सुरुवातीला अमरावती येथील इर्विन रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र प्रकृती गंभीर असल्याने २३ एप्रिल रोजी तिला पुढील उपचारासाठी नागपूर मेडिकलमध्ये रेफर करण्यात आले होते.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक १७ मध्ये तिच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी सकाळी अचानक हा प्रकार उघडकीस आला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तिला संशयास्पद अवस्थेत लटकलेले पाहताच एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती तत्काळ रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांना देण्यात आली.

राधिकाची देखभाल रोहित बॉम्बाटे नावाचा युवक करत होता. तोही उपचारादरम्यान तिच्यासोबत रुग्णालयात उपस्थित होता. घटनेनंतर अजनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

Advertisement

या प्रकरणी अजनी पोलीस आत्महत्या की घातपात, या दोन्ही शक्यतांचा तपास करत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन चंद्रराजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Advertisement
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है वसूली?

FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews #KisanAndolan

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges