Published On : Tue, Mar 10th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील एका फॉर्महाऊसच्या खोलीत अर्धनग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ!

जरीपटका पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखल
Advertisement

नागपूर : नागपूरच्या जरीपटका परिसरातील नारा गावाजवळील एका फार्महाऊसमधील खोलीत अर्धनग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून संशयित आरोपीचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नारा वस्तीत हनुमान मंदिराजवळ राहणारे मोरेश्वर रामाजी तळेकर (वय 63) यांच्या मालकीची ओम शांती नगरी, शिव मंदिर परिसरात सुमारे सात एकर शेती आहे. या शेताची देखभाल करण्यासाठी त्यांनी सोनू उर्फ गोलू अरुण जिभे (वय 30) याला मागील दहा वर्षांपासून केअरटेकर म्हणून ठेवले आहे.

Gold Rate
Mar 10, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,61,800/-
Gold 22 KT ₹ 1,50,500 /-
Silver/Kg ₹ 2,76,300/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या शेताच्या एका भागात वीटभट्टीसाठी जागा भाड्याने देण्यात आली असून दुसऱ्या बाजूला तळेकर यांनी 10 बाय 10 आकाराच्या पाच खोल्या बांधल्या आहेत. त्यापैकी काही खोल्यांमध्ये जनावरांचा चारा ठेवला जातो, तर दोन खोल्या भाड्याने देण्यात आल्या आहेत.

८ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ७ वाजता केअरटेकर सोनू जिभे याने तळेकर यांना फोन करून शेतातील चौथ्या क्रमांकाच्या खोलीत एका अज्ञात महिलेचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती दिली. त्यानंतर तळेकर घटनास्थळी पोहोचले असता संबंधित महिला अर्धनग्न अवस्थेत मृत पडलेली दिसून आली. मृतदेहावर अळ्या पडलेल्या असल्याने मृत्यू काही तासांपूर्वी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

प्राथमिक माहितीच्या आधारे जरीपटका पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. पुढील चौकशीत मृत महिलेची ओळख दासिया रामप्रसाद उईके (वय अंदाजे ४० ते ५० वर्षे), रा. छपारा, जिल्हा सिवनी (मध्यप्रदेश) अशी पटली. ती मजुरीचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

शवविच्छेदन अहवाल आणि तपासातून महिलेच्या पोटावर बोथट वस्तूने मारहाण करण्यात आल्याने तिचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात मृत महिलेबरोबर राहत असलेला राजेंद्र यादव (वय ४०) याच्यावर संशय व्यक्त करण्यात येत आहे.

गजानन नगर, जरीपटका येथील आरती बल्लूप्रसाद धुर्वे (वय ३२) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा तपास जरीपटका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक खुटवाल करत असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथक रवाना केले आहे. पुढील तपास सुरू आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement