Published On : Tue, Aug 11th, 2020

माजी सैनिक ४० वर्षापासून मेडिकल पेन्शन पासून वंचित

नागपूर: भारत सरकार रक्षा मंत्रालय पूर्व सैनिक कल्याण विभाग साऊथ ब्लॉक नई दिल्ली हेड ऑफिस अंतर्गत 69 fd Regt C/O, 56 APO येथे कार्यरत होते. काही वर्षापूर्वी नागपूरचे सुधाकर माणिकराव ठाकरे आता हल्ली मुक्काम प्लॉट नंबर 47 गव्हरमेंट प्रेस कॉलनी, दाभा नागपूर येथे राहत असून काही वर्षापासून नोकरीवरून कमी करण्यात आले होते. मी माजी सैनिक आहे. मी फौजमध्ये ४ वर्ष नोकरी केली असून भारतमातेची शपथ घेतली. ट्रेनिंग सुद्धा केले ते युनिटमध्ये लांब धावपट्टू म्हणून ओळखत होते. मी पोखरण रेंज च्या स्कीम मध्ये सहभागी झालो होतो.

कॉर्टर गार्ड मध्ये चोवीस घंटे कितीतरी वेळा २४ घंटे ड्यूटी बजावली. त्यांच्या रेकॉर्ड’मध्ये चार्जशीट वगैरे काही नसताना माझे कमांडर एस.के.थडाणी, लेफ्टनंट कर्नल यांनी माझ्या सर्टिफिकेट वरील Very good लिहिले होते. परंतु ड्युटी मध्ये असताना माझे डोके दुखत असल्यामुळे सीख रिपोर्ट वर जात होतो. मी दोन ते तीन महिने सीख रिपोर्ट जात होतो. त्यारम्यान मला त्यांनी मेंटल हॉस्पिटल अहमदाबाद ला पाठविले.

तिथे माझा इलाज झाला. तीन ते चार आठवडे राहिल्यानंतर डॉक्टरांनी 14% डीसॅबिलिटी देऊन मला घरी पाठविले. त्यावेळेस माझ्या लक्षात आले नाही कारण मी दुखात होतो. परंतु माझ्यावर खूप अन्याय झाला. मला त्यांनी 20% डिसॅबिल्टी द्यायला पाहिजे होती म्हणजे आज मला मेडिकल पेन्शन मिळाली असती. पण तसे झाले नाही माझ्यावरील डिपारमेंटने खुप मोठा अन्याय केला आहे. आज माझ्यावर उपासमारीची वेळ आली असून मी पेन्शनपासून वंचित आहे. परंतु मला डिपारमेंन्टने 2 वर्षानंतर रिविजन करिता बोलाविले होते. परंतु माझी आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची होती, माझ्याजवळ तिकीट काढण्याकरिता सुद्धा पैसे नव्हते. मी त्यावेळेस एक टाईम उपाशी राहून कसेतरी दिवस काढत होतो. हे पण मी आपल्याला सांगू इच्छितो.

त्या कारणास्तव मी रिविजन ला जाऊ शकलो नाही. ज्यावेळेस श्रीमती इंदिरा गांधींनी आपातकाल लावला होता त्यावेळेस जे लोक जेलमध्ये बंद होते, त्या लोकांना देवेंद्र फडणवीस सरकारने 10 हजार रुपये पेन्शन दिले आणि आजही देत आहे. तर मी फौज मध्ये 4 वर्षे नोकरी केली असून मला पेन्शन मिळालीच पाहिजे आणि मला 20 % डिसॅबिलिटी द्यायलाच पाहिजे, मला मिळालीच पाहिजे, मला मिलिटरी चे स्टेटस मिळालेच पाहिजे. माझा आर्मी नं. १४३२५१७२ आहे. माझ्याजवळ १९७९ पासून ऑफिसचे डॉक्युमेंट आहे व याबाबतीत मी राष्ट्रपती पर्यंत अर्ज केलेत व पंतप्रधानांही लेटर दिले आहे. सगळ्यांना पत्र पाठविले. रक्षामंत्री यांना सुद्धा पत्र पाठविले परंतु माझ्या सोबत अन्याय झाला आहे. तरी आपण मला न्याय मिळवून द्यावा ही माझी आग्रहाची विनंती आहे. असे पत्रपरिषदेत सुधाकर माणिकराव ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले.