महात्मा फुले वॉर्ड येथील 35 वर्षीय युवक. तर अंबाला वॉर्ड येथील 30 वर्षीय युवक. कोरोंना पौझीटीव्ह
रामटेक -अपेक्षे प्रमाणे कोरोणाची साखळी अध्यापही तुटू शकली नाही. रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे .
नगरधन,हिवरा बाजार, मनसर, बोरडा, बंजार ( पथरई)आणि आता रामटेक शहरात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातले आहे. आज 34 रपिड आंटीजिन टेस्ट केल्या त्यांपैकी 2 कोरोंना पौझीटीव्ह निघाले असल्याचे उपजिला कुटिर रूग्णालय चे वैदकिय अधीक्षक डॉ.प्रकाश उजगरे यांनी सांगीतले. रामटेक शहरात आज 2 positive. आले असुन महात्मा फुले वॉर्ड येथील 35 वर्षीय युवक. सदर युवक नागपूर येथील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी आहे. तर अंबाला वॉर्ड येथील 30 वर्षीय युवक.
खूमारी टोल नाका येथे वसुलीचे कार्य करतात. निरंतर सर्वेक्षण अंतर्गत नगरपरिषद मार्फत swab घेण्यात आला होता. High-Low Risk संपर्क काढणे सुरू आहे.1820 जन यांनी टेस्ट केलेल्या पैकीं शहरात आज अखेर एकूण 24 रुग्ण संख्या असल्याचे मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी सांगीतले तेवढा भाग सील केला असून सेनीटाईज करण्यात आला असून त्यांच्या संपर्कात आलेल्याची रिपोर्ट घेणे सुरू असून क्वारांटाईन ची प्रोसेस सुरू असल्याचे. मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी सांगितले .
जिकडे तिकडे सध्या रुग्ण संख्या वाढत असून रामटेक शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता प्रभावी उपाययोजनांची गरज … असल्याचे मत नागरिक करीत आहे. परिस्थिती आटोक्यात येण्याऐवजी रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ. होत आहे..
तहसिलदार बालासाहेब मस्के , मुख्याधिकारी स्वरूप खारगे उपजिला कुटिर रूग्णालय चे वैदकिय अधीक्षक डॉ.प्रकाश उजगरे,आरोग्य अधीकारी रोहित भोईर, पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर हे उद्भवणाऱ्या परिस्थितीवर विषेश लक्ष ठेऊन आहेत. प्रशासन कडुन सर्वोतोपरी आळा घालण्याचे प्रयत्न सुरु च आहेत. कोरोणा चा सामना करण्यासाठी प्रशासना ला सहकार्य करुन सतर्कता बाळगण्याचे अावाहान मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी केले आहे.

