Published On : Mon, Jun 1st, 2020

नागपुरातील न्यू नंदनवन, नरेंद्रनगर परिसर सील

Advertisement

नागपूर : महापालिकेच्या धंतोली झोनमधील प्रभाग क्रमांक ३५ मधील अरविंद सोसायटी नरेंद्रनगर व नेहरूनगर झोनमधील प्रभाग २७ मधील न्यू नंदनवन या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये याकरिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे आदेश सोमवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले.

शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खासगी डॉक्टर, परिचारिका, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलिस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

न्यू नंदनवन प्रतिबंधित क्षेत्र
पश्चिमेस-गजानन धान्य भांडार
उत्तरेस -प्रियदर्शिनी इंजिनिअरिंग कॉलेज गेट
पूर्वेस -४५४, के.डी. साखरखाटे यांचे घर
दक्षिणेस-१३९९, वैद्य यांचे घर
दक्षिणपश्चिमेस -व्ही.एम. नखाते यांचे घर

अरविंद सोसायटी नरेंद्रनगर प्रतिबंधित क्षेत्र
दक्षिणपूर्वेस -पडलकर प्लॉट, अरविंद सोसायटी
उत्तरपूर्वेस -जे.के. अपार्टमेंट प्लॉट, अरविंद सोसायटी
दक्षिणपश्चिमेस -प्रा. अंबादास येळने प्लॉट नं.११, विजयनंद सोसायटी
उत्तरपश्चिमेस -अजय भोले प्लॉट क्र. ६७, विजयानंद सोसायटी