Published On : Wed, Jun 10th, 2026
By Nagpur Today Nagpur News

‘देऊळ बंद’च्या नफ्यातील प्रत्येक रुपया शेतकरी मुलांच्या शिक्षणासाठी; नागपुरात प्रवीण तरडेंची मोठी घोषणा

Advertisement

नागपूर : समाजात वाढत चाललेल्या नैराश्याला आणि नकारात्मकतेला उत्तर देत सकारात्मक विचारांचा संदेश देणारा ‘देऊळ बंद’ हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहणार नसून समाजकारणाचेही महत्त्वपूर्ण कार्य करणार आहे. चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी नागपुरात याबाबत मोठी घोषणा केली.

‘देऊळ बंद’ चित्रपटाच्या नफ्यातील प्रत्येक रुपया आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला जाईल, असे तरडे यांनी जाहीर केले. चित्रपटाच्या निर्मिती आणि प्रसिद्धीचा खर्च वजा केल्यानंतर उरणारी संपूर्ण रक्कम या सामाजिक उपक्रमासाठी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता असताना चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. त्या काळात स्वतःचे मानधन आणि निर्मात्यांकडून मिळालेली रक्कम एकत्र करून सुमारे १९ लाख ७ हजार रुपयांची मदत गरजू शेतकरी कुटुंबांना करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न अद्याप गंभीर असल्याचे नमूद करत, समाजाने या समस्येकडे अधिक संवेदनशीलतेने पाहण्याची गरज असल्याचे तरडे म्हणाले. “आत्महत्या करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,” हा आशावादी संदेश चित्रपटातून दिला जाणार असून अंधश्रद्धेपेक्षा कर्मावर विश्वास ठेवण्याचे आवाहनही करण्यात येणार आहे.

Advertisement

यावेळी ज्येष्ठ अभिनेते Mohan Joshi यांच्या जिद्दीचा उल्लेख करत, गंभीर आजारावर मात करून त्यांनी पुन्हा अभिनय क्षेत्रात सक्रिय योगदान दिल्याचे उदाहरण तरडे यांनी दिले. कोणतीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी माणूस नव्याने उभा राहू शकतो, असा प्रेरणादायी संदेश यातून मिळतो, असे त्यांनी सांगितले.

विविध सरकारांनी प्रयत्न करूनही शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण पूर्णपणे कमी झालेले नसल्याची खंत व्यक्त करत, ‘देऊळ बंद’ हा चित्रपट समाजात जनजागृती घडवून आणण्यास आणि सकारात्मक बदलाची दिशा देण्यास मदत करेल, असा विश्वास प्रवीण तरडे यांनी व्यक्त केला.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.