Published On : Tue, Jul 30th, 2019

कुंभारे कॉलोनीतील प्रत्येक बिडी कामगार गाळे धारकाला मालकी हक्क मिळणार:-ऍड सुलेखाताई कुंभारे

Advertisement

कामठी :- राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्या व माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे यांच्या पुढाकाराने विश्वप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या नजीकच असलेल्या ११.४३हॅकटर जागेवरील दादासाहेब कुंभारे बिडी कामगार कॉलोनी येथे बिडी कामगार कल्याण योजनेअंतर्गत म्हाडा मार्फत बिडी कामगारांसाठी 627 घरकुल बांधण्यात आले होते .या बिडी कामगार घरकुल धारकांना मालकी हक्क प्राप्त व्हावा या मुख्य उद्देशाने आज येथील एमटीडीसी सभागृहात बिडी कामगारांचा घरकुल पट्टे वाटप मेळावा आयोजित करण्यात आला होता .या मेळाव्याला बिडी कामगारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून जवळपास सहाशे च्या वर बिडी कामगार घरकुल धारकांना माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे यांच्या शुभ हस्ते घरकुल पट्टे वाटप करण्यात आले.याप्रसंगी कुंभारे कॉलोनीतील प्रत्येक बिडी कामगार घरकुल धारकाला मालकी हक्क मीळणार असल्याचे मौलिक मत ऍड सुलेखाताई कुंभारे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी पालकमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे,,गृहनिर्माण मंडळाचे मुख्यधिकारी संजय भीमनवार,मुद्रांक जिल्हाधिकारी अ.स.उघडे, उपविभागोय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसीलदार अरविंद हिंगे, मूल्यांकन अधिकारी, नागपूर महानगरपालिका सदस्य वंदना भगत,नगरसेविका सावला सिंगाडे, लाला खंडेलवाल आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

बिडी कामगारांचे हृदयसम्राट मानले जाणारे कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या अथक प्रयत्नातून कामठी येथे बिडी कामगार वसाहती करिता ११.४३ हॅकटर जागा शासनाकडून आरक्षित करून घेण्यात आली होती .तर महाराष्ट्रामध्ये फक्त सोलापूर व कामठी येथे घरकुल योजनेचा लाभ घेण्यात आलेला आहे.यानुसार राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्यां व माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे यांनी विश्वप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस टेम्पल नजीक असलेल्या आरक्षित ११.४३हॅकटर जागेवरील दादासाहेब कुंभारे बिडी कामगार कॉलोनी कामठी येथे म्हाडा मार्फत कामगार कल्याण योजनेअंतर्गत ६२७घरे बांधण्यात आले होते त्यामध्ये अत्यल्प उत्पन्नामधील पहोल्या टप्प्यामध्ये १०० गाळे , दुसऱ्या टप्प्यामध्ये १०३गाळे व तिसऱ्या टप्प्यात 424 गाळे बांधण्यात आले होते .परंतु काही तांत्रिकीय कारणास्तव अजूनपावेतो म्हाडामार्फत बांधण्यात आलेली ही घरे म्हाडाद्वारे बिडी कामगारांच्या नावावर करण्यात आलेले नव्हते यावर ऍड सुलेखाताई कुंभारे यांनी निंदनीय चिंता व्यक्त करीत बिडी कामगारांना त्यांच्या घरकुल चा मालकी हक्क मिळावा तसेच बिडी कामगारांवर असलेला थकबाकी वरील व्याज माफ करण्यासंदर्भात 1 जुलै ला ऍड सुलेखाताई कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत कामठी येथील म्हाडा च्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली होती .

या बैठकीत बिडी कामगारांनी क्वार्ट्स चे थकीत रक्कम न भरल्यामुळे बिडी कामगारांना पट्टे वाटप करण्यात आले नसल्याची माहिती संबंधित म्हाडा अधिकाऱ्यांनी दिली याप्रसंगी बिडी कामगारांवर थकीत असलेली रक्कम टप्प्या टप्प्याने भरली जाऊन त्यावर असलेले व्याज माफ करण्याच्या संदर्भात शासनाकडे पाठ पुरावा करण्यात येईल तसेच म्हाडाने बिडी कामगारांनी मुद्रांक शुल्क भरल्यास बिडी कामगारांच्या नावाने घरे करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश ऍड सुलेखाताई कुंभारे यांनी उपस्थित म्हाडा अधिकाऱ्यांना दिले.

या अनुषंगाने आज 29 जुलै ला ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरातील एमटीडीसी सभागृहात महाराष्ट्र राज्य बिडी मजदूर संघ कामठी शाखेच्या वतीने बिडी कामगारांचा घरकुल पट्टे वाटप मेळावा आयोजित करण्यात आला होता.या घरकुल पट्टे वाटप मेळाव्याला बिडी कामगारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येत सहभाग नोंदवून घरकुल पट्टे चा लाभ घेतला.याप्रसंगी लाभार्थी बिडी कामगारांनी ऍड सुलेखाताई कुंभारे चे कौतुक करीत आभार मानले.

बिडी कामगार मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र बिडी मजदूर संघ शाखा कामठी चे समस्त अधिकारी,कर्मचारी वर्ग, बरीएम जिल्हाध्यक्ष अजय कदम, नगरसेविका सावला सिंगाडे, बरीएम तालुकाध्यक्ष उदास बन्सोड, अशोक नगरारे, सुषमा डोंगरे, बरीएम शहराध्यक्ष दिपंकर गणवीर,विष्णू ठवरे, नियाज कुरेशी, अश्फाक कुरेशी, आदींनी मोलाची भूमिका साकारली.