Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Jul 30th, 2019

  …तर २५ गावातील शेतकरी सिंचनापासून वंचित

  कामठी : उमरेड मार्गावरील विहीरगाव येथे पोहरा नदीचे पाणी बंधारा बांधून अडविण्यात आले आहे. परिणामी, २० ते २५ गावांमधील शेतकºयांच्या सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पोहरा नदीचे पाणी भांडेवाडीला जाण्यापासून प्रशासनाने तत्काळ थांबवावे या मागणीला घेऊन आज सोमवार २९ जुलै रोजी सकाळी शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले. शेतकºयांनी शासन, प्रशासनाविरुद्ध तीव्र नारे-निदर्शने करून विहीरगाव परिसर दणाणून सोडला.

  ‘संघर्ष जगण्याचा’ जनआंदोलन चळवळीच्या अध्यक्षा प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांच्या नेतृत्त्वात आज विहीरगाव येथे शेकडो शेतकºयांनी ‘शेतकºयांची मरणयात्रा’ असे अभिनव आंदोलन केले. पोहरा नदीवरील पाण्यावर कामठी व कुही तालुक्यातील पांढुर्णा, तरोडी (बु), खेडी, परसोडी, टेमसना, पांढरकवडा, कुसुंबी, आडका, झरप, खेतापूर, वरंबा, शिवणी, तितूर, चितापूर, बहादुरा आदी २० ते २५ गावातील शेतकºयांचे सिंचन चालते. या भागातील ८० टक्के शेती पोहरा नदीच्या सिंचनाखाली आहे. परंतु, मागील वर्षभरापासून विहीरगाव येथे पोहरा नदीचे पाणी बंधारा बांधून अडविण्यात आले व मनपाद्वारे पोहरा पंपिंग स्टेशनमधून पोहरा नदीचे पाणी भांडेवाडी येथील वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये आणून शुद्ध करण्यात येत आहे. नंतर ते पाणी खापरखेडा येथील निर्माणाधीन ‘विश्वराज’ विद्युुत निर्मिती केंद्राला २०० ‘एमएलडी’ पाणी पुरविण्यात येणार आहे. सध्या हा प्लांट पूर्ण न झाल्याने हे पाणी शुद्ध करून नागनदीला सोडण्यात येते. पाणी शुद्ध करण्याला विरोध नाही. परंतु, शुद्ध केल्यानंतर ते पाणी पुन्हा पोहरा नदीत सोडावे किंवा पोहरा पंपिंग हाऊस विहीरगावच्या बाजूच्या स्मॉल वॉटर ट्रीटमेंट प्लांट तयार करावा, विद्युत प्रकल्पाला पुरविण्यात येणारे २०० एमएलडी पाणी रद्द करावे व नदीचे खोलीकरण करून पाण्याची पातळी वाढवावी आदी शेतकºयांच्या मागण्या आहेत.

  या प्रकल्पामुळे ५० हजार शेतकरी बाधित होणार आहेत. विहीरगाव ते चितापूर या परिसरात एकही तलाव, दुसरी नदी व जलाशय नाही. हे पाणी विश्वराज विद्युत जनरेशन प्लांटला वळते झाल्यास या भागातील भू-जलसाठ्यावर परिणाम होऊन ट्युबवेल व या विहिरीवर सिंचन करणारे शेतकरी वंचित राहतील. ‘पोहरा’चे पाणी भांडेवाडीला जाण्यापासून थांबविण्यासाठी शेकडो शेतकºयांना रस्त्यावर उतरावे लागले. ‘शासनाचे धोरण, शेतकºयांचे मरण’, ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘या शासनाचे करायचे काय, खाली डोके वर पाय’ आदी घोषणा देत शेतकºयांनी तीव्र नारे-निदर्शने करून परिसर दणाणून सोडला. आंदोलनात शेकडो शेतकºयांचा सहभाग होता.

  १०० शेतकºयांचे मुंडण; तहसीलदारांची भेट
  हक्काच्या पाण्यासाठी आज शेतकºयांनी तीव्र नारे-निदर्शने करून शासन, प्रशासनाचे लक्ष वेधले. याशिवाय १०० शेतकºयांनी आंदोलनस्थळी मुंडण करून जीवघेण्या निर्णयाचा तीव्र विरोध केला. नागपूर ग्रामीणचे तहसीलदार मोहन टिकले यांनी आंदोलनस्थळी सकाळी भेट दिली. प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांच्याशी मागण्यांसदर्भात चर्चा करून टिकले यांनी निवेदन स्वीकारले. तत्पूर्वी तिरडी बांधून शेतकºयांची प्रतिकात्मक मरणयात्रा आंदोलकांकडून काढण्यात येणार होती. मात्र, पोलिसांनी तिरडीच जप्त केली.

  शेतकºयांनी जगायचे कसे? – प्रा. अवंतिका लेकुरवाळे
  पोहरा नदीच्या पाण्यावर २० ते २५ गावातील शेतकºयांचे सिंचन चालते. हक्काचे पाणी दुसरीकडे वळविण्यासाठी प्रशासनाने घाट घातला आहे. असे झाल्यास हजारो शेतकरी सिंचनापासून वंचित राहतील आणि त्यांचा जगण्या-मरण्याचा प्रश्न निर्माण होईल. शेतकºयांना जगवण्याऐवजी त्यांना देशोधडीला लावणे हे कितपत योग्य आहे? असा सवाल ‘संघर्ष जगण्याचा’ जनआंदोलन चळवळीच्या अध्यक्षा प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांनी उपस्थित केला आहे.
  आंदोलन स्थळी उस्फुर्तपणे मा. पुरुषोत्तमजी शहाणे मा. शिक्षण सभापती जि. प. नागपुर. मा. हुकुमचंदजी आमदरे सभापती रमेशजी जोध उपाध्यक्ष जि. कॉ. क. नागपुर ग्रामिण कुणबी सेना अध्यक्ष सुरेश वर्षे, आशिष मल्लेवार बहुउद्देशीय तिरळे कुणबी संघाचे वामनजी येवले मनोहरजी कोरडे तापेश्वरजी वैज्ञ राजेंद्र लांडे, राजेश निनावे डडुरे पाटिल राजेश ठवकर यांनी भेट दिली क्रिष्णाजी शहाणे, दिनेश ढोले अतुल बाळबुधे प्रेम चांभारे, अमोल चांभारे, श्रीहरी देवगडे, संजय गावंडे मदन गोमकर, मनोहरजी शहाणे विलास मोहड, माणीकजी खेटमले अमोल मोहड केवल फळके

  अनेक युवकांनी मुडन करुन निषेध व्यक्त केला. यामध्ये प्रामुख्याने
  परमेश्वर चिकटे, विजय खोडके, निरंजन खोेडके, मुरलीधर ठाकरे, मंगेश मानमोडे, रमाकांत देवुळकर, चेतन चांभारे इ. अनेकांनी मुडन करुन निषेध व्यक्त केला.५ ऑगस्टला सभा लावुन यावर निर्णय देणार असण्याचे आश्वासन आंदोलन स्थळी डेप्युटि इंजिनियर गजभिये सर यांनी आयुक्तांच्या वतिने दिले. प्रसंगी दुरध्वनी द्वारे सहआयुक्त जोषीसर यांच्याशी गजभिये सर यांनी आंदोलन कर्त्याचे बोलणे करुन दिले.

  ५ ऑगस्ट पर्यंत पोहरा नदिचे पाणि शेतक-यांना देण्याविषयी निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तिव्र करण्याचा इशारा प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांनी दिला.
  आडका येथिल शेतक-याचा अनोखा प्रण शेतक-यांना पाणि न दिल्यास निवडणुक प्रचारासाठी नेत्यांना गावात घुसु देणार नाही व निवडणुकिवर बंदि टाकु.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145