Published On : Sat, Sep 19th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात इंजिनिअरिंगचा विद्यार्थी एमडी तस्करीत; १८ ग्रॅम एमडीसह दोघांना अटक

Advertisement

ऑटोमोटिव चौक में एमडी की खेप के साथ दो गिरफ्तार

नागपूर : नागपुरात एमडी ड्रग्स तस्करीविरोधात क्राइम ब्रँच युनिट-६ ने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली. यामध्ये एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा समावेश आहे. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली असून, आरोपींकडून १८ ग्रॅम एमडी ड्रग्ससह सुमारे १२ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

क्राइम ब्रँचची टीम पहाटे जेसीबी कंपनीसमोर, ऑटोमोटिव्ह चौक आणि शेरे पंजाब लॉन परिसरात गस्त घालत असताना दोन युवक संशयास्पदरीत्या आढळले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता विक्रीसाठी ठेवलेले १८ ग्रॅम एमडी पावडर मिळून आले. त्याची किंमत सुमारे ९० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मनोज मोहनलाल गुप्ता (३०, यशोधरानगर) आणि रिचर्ड प्रनुत फेड्रिक्स (२४, कपिलनगर) अशी आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, रिचर्ड हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे.

पोलिसांनी आरोपींकडून ५०० रुपये रोख, ८० हजार रुपये किमतीची अ‍ॅक्टिव्हा, ५२ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल आणि सुमारे १० लाख रुपये किमतीची टाटा नेक्सॉन कार असा मुद्देमाल जप्त केला. चौकशीत एमडी ड्रग्स यशोधरानगर येथील लकी साहूकडून मिळाल्याचे आरोपींनी सांगितले. त्यामुळे पोलिसांकडून लकी साहूचा शोध सुरू आहे. दोन्ही आरोपींना एनडीपीएस कायद्यानुसार पुढील कारवाईसाठी पाचपावली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.