Published On : Thu, Jun 18th, 2020

ऊर्जामंत्र्यांची वीज उपकेंद्राला भेट

नागपूर: राज्याचे ऊर्जामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितीन राऊत यांनी काटोल येथील महा पारेषणच्या १३२ कि.व्हो. वीज उपकेंद्राला नुकतीच भेट दिली. संपूर्ण काटोल व नरखेड तालुक्यात असलेल्या महावितरणच्या ३३ कि. व्हो. वीज उपकेंद्रांना येथून वीज पुरवठा केल्या जातो.

या वीज उपकेंद्रास १३२ कि. व्हो. कळमेश्वर उपकेंद्रातून वीज पुरवठा होतो. जर या वीज वाहिनीत काही तांत्रिक बिघाड झाल्यास संपूर्ण काटोल व नरखेड तालुका अंधारात जातो . अशा प्रसंगी पर्यायी मार्गाने वीज पुरवठा कसा करता येईल याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश यावेळी ना. राऊत यांनी दिले.यावेळी ऊर्जामंत्र्यांनी उपस्थित महापारेषणच्या अधिकाऱ्यांकडून सुरु असलेल्या कामाची माहिती घेऊन एकूण कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.

Advertisement

तसेच वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे आदेश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. येथील ३३ कि.व्हो. मूर्ती उपकेंद्रास १३२ कि.व्हो. हेटीकुंडी येथून वीज पुरवठा करण्यासाठी प्रस्ताव आपल्याकडे मंजुरीसाठी पाठवण्याचे आदेश दिले.

या नंतर ऊर्जामंत्री नामदार राऊत यांनी काटोल-नरखेड मार्गावरील असलेल्या ४४ मेगा वॅट सौर ऊर्जा प्रकल्पाची पाहणी केली. शासनाचे अपारंपारिक ऊर्जा निर्मितीस प्रोत्साहन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Advertisement
Advertisement
Advertisement