Published On : Thu, Jun 18th, 2020

काचूरवाही येथील वीज पुरवठा पूर्ववत

Advertisement

Mahavitaran Logo Marathi

नागपूर: वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे खंडित झालेला रामटेक तालुक्यातील काचूरवाही येथील वीज पुरवठा महावितरणकडून पूर्ववत करण्यात आला आहे.

महावितरणच्या रामटेक उपविभागात येणाऱ्या काचूरवाही शहर परिसरात वीज पुरवठा करणारी वीज वाहिनीवरील वीज पुरवठा १५ जूनला खंडित झाला होता. काहूरवाहीसह मसाला,वडगाव,दुधाला , किरणापूर, खंडाळा, खोडगाव,शिरपूर, खोबराभट्टी या गावाना महावितरणच्या ३३ कि. व्हो. आरोली वीज उपकेंद्रातून वीज पुरवठा होतो. या गावाना वीज पुरवठा करण्यासाठी जंगलातून महावितरणकडून येथे ३४ किलोमीटर लांबीची वीज वाहिनी टाकण्यात आली आहे. या परिसरात आकाशातील वीज पाडण्याचे प्रमाण जास्त असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

Gold Rate
July 10 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 44,400 /-
Gold 22 KT ₹ 1,34,000 /-
Silver/Kg ₹ 2,25,100/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याचा परिसरात जूनच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे ३५ लघुदाब आणि १ उच्चदाब विजेचे खांब जमीनदोस्त झाले होते. महावितरणच्या जनमित्रांनी धावपळ करून येथील वीज पुरवठा पूर्ववत केला होता. मे आणि जून महिन्यात झालेल्या वादळी वारे आणि पावसामुळे या वीज वाहिनीवर १५ वेळा वीज पुरवठा खंडित झाला होता. काहूरवाहीसह मसाला,वडगाव,दुधाला , किरणापूर, खंडाळा, खोडगाव,शिरपूर, खोबराभट्टी या गावाना वीज पुरवठा करणारी वीज वाहिनी जंगलातून जात असल्याने वीज पुरवठा खंडित झाला की तो पूर्ववत करण्यासाठी ३४ किलोमीटर लांब वीज वाहिनीची तपासणी करावी लागते. अनेकदा महावितरण कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणींवर मात करीत महावितरणचे जनमित्र वीज पुरवठा सुरळीत करतात.

सातत्याने या परिसरात वीज पुरवठा खंडित होत असल्याने मौदा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित परांजपे यांनी ३४ किलोमीटर लांबीच्या वीज वीज वाहिनीची देखभाल आणि दुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते. यानुसार महावितरणच्या जनमित्रांनी या वीज वाहिनीवर येणाऱ्या झाडांच्या फांद्याची छाटणी करणे, झोल खाणाऱ्या वीज वाहिन्या मजबूत करणे, पिन इन्सुलेटर बदलणे आदी कामे केली. यामुळे काचूरवहीसह परिसरातील गावाना अखंडित वीज पुरवठा सुरु झाला आहे. या परिसरात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नियुक्त जनमित्राचे पद रिक्त असल्याने तूर्तास कंत्राटी पद्धतीने येथे एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

खराब बीज से किसानों पर दोहरी मार #Amravati #Farmers #BadSeeds #CropLoss #MaharashtraNews

खराब बीज से किसानों पर दोहरी मार #Amravati #Farmers #BadSeeds #CropLoss #MaharashtraNews

ज्ञानगंगा में मस्ती करता भालू वायरल ...#vidharbha #updatenews #latestnews #maharashtranews

ज्ञानगंगा में मस्ती करता भालू वायरल ...#vidharbha #updatenews #latestnews #maharashtranews

नंदिग्राम एक्सप्रेस में हनीमून सजावट वायरल ...#updatenews #latestnews #maharashtra #maharashtranews

नंदिग्राम एक्सप्रेस में हनीमून सजावट वायरल ...#updatenews #latestnews #maharashtra #maharashtranews

कूलर के पानी से शुरु हुआ विवाद, खूनी हमले में बदला #nagpurnews #CrimeNews #Assault #Violence #crime

कूलर के पानी से शुरु हुआ विवाद, खूनी हमले में बदला #nagpurnews...

कुएं में गिरे तेंदुएका सफल रेस्क्यू #Leopard #LeopardRescue #RescueOperation #ForestDepartment

कुएं में गिरे तेंदुएका सफल रेस्क्यू #Leopard #LeopardRescue #RescueOperation #ForestDepartment

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges