Published On : Wed, May 17th, 2017

केलेल्या कामांच्या अनुषंगानेचे कर्मचा-यांना वेतन मिळणार

Advertisement


नागपूर:
 महावितरण अधिकारी आणि कर्मचा-यांना नेमून दिलेली कामे पुर्ण केल्याचा तपशिल संपुर्ण घोषवा-यासह स्वत: प्रमाणित करून सादर करावयाच्या असून त्याअनुषंगाने त्यांचे वेतन देण्याच्या सुचना नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता रफ़ीक शेख यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांना दिले आहेत.

वीजपुरवठ्याची गुणवत्ता कायम राखणे, वीज बिलांचा भरणा न करणा-या ग्राहकांना प्रत्यक्ष भेट देत त्यांना बिल भरण्यासाठि प्रवृत्त करीत बिलांचा भरणा करणा-या ग्राहकांची संख्या वाढ़विणे या कामगिरीच्या आधारे प्रत्येकाने आपण केलेल्या कामाचा घोषवारा स्वत: प्रमाणित करून द्यायचा आहे त्या अनुषंगानेच वेतन देण्याच्या सुचना सर्व संबंधितांना सुचना देण्यात आल्या असून या सुचना देण्यासाठी नागपूर परिमंडलांतर्गत असलेल्या तब्बल ४० उपविभाग़िय कार्यालयांत एकाचवेळी आणि एकाच दिवशी बैठकांचे आयोजन करण्यात आले.

यापैकी प्रत्येक एका बैठकीला मुख्य अभियंता आर. जी. शेख, अधीक्षक अभियंता मनिष वाठ, नारायण आमझरे आणि सुनिल देशपांडे यांच्यासह प्रत्येक कार्यकारी अभियंते त्यांच्याशी संबंधीत भागातील बैठकीत सहभागी झाले होते. कर्मचा-यांनी मुख्यालयी राहून वीजपुरवठा खंडित होणार नाही आणि तो झाल्यास त्वरीत दुरुस्तीसाठी उपलब्ध राहणे, थकबाकी कमी करणे, वीजबिलांचा भरणा केलेल्या ग्राहकांची संख्या वाढविणे, तात्पुरता वीज पुरवठा खंडित केलेल्यांची योग्य नोंद ठेवणे, पुनर्जोडणी शुल्क भरल्यानंतरच वीजपुरवठा जोडून देणे, नवप्रकाश योजनेतील संभाव्य लाभार्थ्याला त्याच्या देयकासह विनंतीपत्र जनमित्राने स्वत: त्याच्या पत्त्यावर पोचते करणे व त्याला तेथे वीजपुरवठा सुरु असल्यास तात्काळ संबंधितांवर कार्यवाही करणे, रोहीत्र बिघाडाच्या घटनांचे विश्लेषण करणे, प्रत्येक जनमित्राने दररोज किमान एका कृषीपंपाची तपासणी करून त्याचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करणे, साडेसात एचपीपेक्षा अधिकच्या कृषीपंपांना मीटर बसविणे आणि अपघातविरहीत सेवा देणे आदी मुद्द्यांवर या बैठकीचे वेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

Gold Rate
13 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,41,000/-
Gold 22 KT ₹ 1,31,100 /-
Silver/Kg ₹ 2,64,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुख्य अभियंता आर. जी. शेख हे स्वत: या बैठकींची माहिती वेळोवेळी घेत होते, याशिवाय ते स्वत:ही अकस्मितरित्या एका बैठकीला उपस्थित राहिल्याने तेथील अभियंते आणि कर्मचा-यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. महिन्यातून किमान एक बैठक जनमित्रांसोबत घ्याव्यात अश्या सुचना शेख यांनी सर्व अभियंत्यांना केल्या आहेत.

वितरण रोहीत्रे फ़ोडणा-यांविरोधात महावितरण आक्रमक

दरम्यान विज वितरण व्यवस्थेचा अविभाज्य अंग असलेल्या रोहीत्रांना फ़ोडून त्यातील ऑईल चोरणा-यांविरोधात अधिक आक्रमक पवित्रा घेत, ह्या चोरट्यांविरोधात संबंधित पोलीस ठाण्यत गुन्हे दाखल करीत त्यांना हुडकून काढण्याची मोहीम महावितरणतर्फ़े मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहे. वितरण रोहीत्रातील ऑईल चोरी गेल्याचा त्रास हा सामान्य वीज ग्राहकांना मोठ्या प्रमाणात होत असल्याने, तत्सम रोहीत्र त्वरीत दुरुस्त किंवा बदली करून त्यावरील वीज पुरवठा प्राधान्याने सुरळीत करण्याचे निर्देश सर्व संबंधितांना देण्यात आले आहेत.


मागिल काही दिवसांत रामटेक परिसरात वितरण रोहीत्रातील ऑईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, त्याविरोधात महावितरणने त्या अज्ञात चोरट्यांविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. या घटनांना अत्यंत गांभिर्याने घेत ऊर्जा मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्या चोरट्यांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश महावितरण अधिका-यांना दिले असून, या सर्व घटनांप्रकरणी महावितरणतर्फ़े गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वितरण रोहीत्र फ़ोडून त्यातील ऑईल चोरीच्या या घटनाचा झडा लावून या अज्ञात चोरांना हुडकून काढण्यासाठी महावितरण आक्रमक असून याबाबत वरीष्ठ पोलीस अधिका-यांनाही याबाबत विनंती करण्यात आलेली आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement