Published On : Wed, Aug 14th, 2019

स्वच्छता कंत्राटदारच्या कामबंद मुळे कन्हान ला अस्वच्छतेचे साम्राज्य

Advertisement

कन्हान : – नगरपरिषद अंतर्गत आरोग्य व स्वच्छता कंत्राटदाराच्या स्वच्छता कर्मचा-यांना भविष्य निधी कपात करून योग्य वेतन महिन्याच्या १० तारखेला नियमित मिळत नसल्याने स्वच्छता कर्मचा-यांचे सहा दिवसापासुन कामबंद आंदोलनामुळे कन्हान शहरात अस्वच्छते चे साम्राज्य पसरल्याने रोगराई फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नगरपरिषद कन्हान-पिपरी अंतर्गत संपुर्ण शहराच्या आरोग्य व स्वच्छतेचे संपुर्ण काम करण्याचा कंत्राट अल्ट्रा क्लीन एण्ड केअर कंपनी जबलपुर ला देण्यात आले आहे. दि. ०९/०८/२०१९ पासुन कंत्राटदाराने कुठलीही पुर्व सुचना न देता आरोग्य व स्वच्छतेचे काम अचानक बंद केल्याने कन्हान शहरात स्वच्छता होत नसल्याने जागोजागी कचरा, कचरा गाडी बंद मुळे घरोघरी कचरा जमा झालेला आहे. नाल्याच्या बाजुला व नाल्यात कचरा आण घाण पाणी जमा तसेच मेलेले जनावरे पडुन असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. यामुळे रोगराई फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नसुन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. दिल्ली ते गल्ली पर्यंत स्वच्छ भारत अभियानातंर्गत संपुर्ण देशात अमाप निधी खर्च होत असताना पावसाच्या दिवसात, सणवार आणि १५ ऑगस्ट स्वातंत्र दिनाचा उत्सव असताना सुध्दा कन्हान शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले आहे. कन्हान पासुन केंद्रापर्यंत भाजपची सत्ता असताना कन्हान ची ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.

मागील ६ दिवसापासुन नगरपरिषद कन्हान स्वच्छता विभागातील कर्मचारी, घंटागाडी बंद आंदोलनामुळे नागरिकां च्या घरात भरपुर जमा झालेला कचरा व नागरिकांचा त्रास सहन न झाल्याने आज (दि.१४) ला विरोधी नगरसेवक राजेश यादव यांनी स्वतः कचरा गाडी चालवुन प्रभाग क्र २ हनुमान नगर कन्हान येथील कचरा भरून बाहेर नेऊन टाकला.

नगरपरिषद कन्हान-पिपरी चे सभापती गेंदलाल काठोके हयानी मुख्याधिकारी सतिश गावंडे हयाना निवेदन व प्रतिलिपी मा. जिल्हाधिकारी नागपुर आणि नगराध्यक्ष शंकर चहांदे हयाना देऊन अल्ट्रा क्लीन एण्ड केअर या कंत्राटदाराने आरोग्य व स्वच्छतेचे काम सुचना न देता बंद केल्याने शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरून नागरिकां ना त्रास सहन करावा लागत असल्याने कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करून कामबंद असलेल्या दिवसाची रक्कम व दंडात्मक रक्कम बिलातुन कपात का करण्यात येऊन नयेे ? नागरिकांच्या ज्वलंत समस्ये कडे लक्ष केंद्रित करून शहरात त्वरित आरोग्य व स्वच्छतेची कामे सुरळीत सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.