Published On : Wed, Aug 14th, 2019

पर्यावरणाचे संवर्धन करणे काळाची गरज – नागेश सहारे

Advertisement

भांडे प्लॉट येथे वृक्षारोपन

नागपूर: पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गाचे संवर्धन करणे प्रत्येकाची मुलभूत जबाबदारी बनली असून वृक्षारोपन व पर्यावरणाचे संवर्धन करणे भावी पिढ्यांसाठी काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन आरोग्य मनपा विभागाचे उपसभापती व प्रभाग क्रमांक -30 चे नगरसेवक नागेश सहारे यांनी केले.

भांडे प्लॉट येथील उमरेड मार्गावर नगरसेवक नागेश सहारे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी हेमंत गुडधे, प्रभाकर मदने, आशु मदने, सक्करदरा ठाण्याचे पोलिस शिपाई अण्णाजी बोरकर, तबस्सुम बेग, मधुर मेश्राम, दीपक दहिवले, संजय मेश्राम आदींच्या उपस्थितीत अनेक प्रजातींच्या रोपट्यांची लागवड करण्यात आले.

पुढे बोलतांना नगरसेवक सहारे म्हणाले की, वृक्षारोपण करताना सावली देणाºया वृक्षांसोबतच फळांची झाडे लावण्यावर भर दिला जावा, त्यामुळे येणाऱ्या पिढ्यांनाही त्याचे फळ चाखता येऊ शकेल. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्रत्येकानेच पुढाकार घेऊन वृक्षारोपण करण्याचे आवाहन नगरसेवक नागेश सहारे यांनी केले. यावेळी प्रभाग क्रमांक -30 भांडे प्लॉट येथील नागरिकांची उपस्थिती होती.