Published On : Tue, Aug 13th, 2019

सातगाव येथे घाणीचे साम्राज्य

पाळीव प्राण्यांच्या मलमूत्रा मूळे परिसरात घाण व दुर्गंधी,प्राणी मालकांची मुजोरी व ग्रामस्थांना धमकी,रस्त्यावरच बांधतात पाळीव प्राणी,स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष

नागपूर:-बुटी बोरी औधोगिक क्षेत्राची स्थापना सन १९८९ -९० झाली.त्यामुळे या औधोगिक क्षेत्रातील उद्योगांना लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था करण्याकरिता वेना नदीवर रामा येथे मोठे धरण बांधण्यातआले.या धरणाच्या विस्तीर्ण जलाशया खाली येणारी सर्वच सर्व गावे उठवून त्यांचे १९९७- ९८ ला बुटी बोरी जवळ वेनानगर (सातगाव) म्हणून पुनर्वसन करण्यात आले.सातगाव अंतर्गत किन्हाळा,दुधाळा ,मसाळा,कन्हाळगाव,रिधोरा,जयपूर आणि बोरगाव असे सात गावे येतात.या सात गावामिळून १९९७-९८ ला सातगाव (वेनानगर) चे पुनर्वसन झाल्यानंतर शासनाने येथे आदर्श नगररचने प्रमाणे गाव वसविण्यात आले.

गावात रस्ते,वीज,पाणी,शाळा आदींची व्यवस्था करून देऊन गावालामहसुली दर्जा प्राप्त झाला. त्यानंतर गावाच्या विकास कामांकरिता ग्रामपंचायत बनविण्यात आली.परंतु आजघडीला येथील स्थानिक प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे गावात काही गुंड प्रवृत्तीच्या,समाजकंटक लोकांची अरेरावी सुरू असून गावाचे स्वास्थ बिगडविण्यास कारणीभूत ठरून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

देशाचे पंतप्रधान यांनी स्वच्छतेचा मंत्र पुकारत स्वच्छतेकडून समृद्धीकडे नेण्याचा संकल्प केला आहे.या अंतर्गत शासनाने रोगराईवर आळा घालण्यासाठी स्वच्छता किती महत्वाची आहे,याचे विविध योजनांतून प्रबोधनातून बाळकडू पाजले.तसे निर्देशही दिले.पण येथील समाजमन स्वच्छतेविषयी जागृत नाही.त्याच प्रमाणे स्थानिक स्तरावरील प्रशासनही याबाबद गंभीर नसल्याचे दिसून येते.म्हणून केंद्र सरकारने राबविलेल्या स्वच्छता अभियान केवळ कागदावरच असल्याचे चित्र ग्रामपंचायत सातगाव येते पहावयास मिळत आहे.

येथील किन्हाळा या गावातील विज्ञान तुरणकर,पियुष नांदेकर,जितेंद्र तुरणकर व दीपक जीवतोडे नावाचे इसम हे गाय, म्हैस व बकऱ्या यासारखे पाळीव प्राणी पाळतात.परंतु ते आपली जनावरे आपल्या खाजगी जागेत न बांधता रस्त्यावर बांधत असतात.त्यामुळे त्या पाळीव जनावरांची विष्ठा,मलमूत्र हे रस्त्यावर येत असते.यामुळे परिसरात अत्यंत घाण होऊन परिसरात दुर्गंधी वाढलेली आहे.या घाणीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रस्त्यावर चिखल होऊन रस्त्याने पायदळ चालणेही ग्रामस्थांना मुश्किल झाले आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावर साचलेले जनावरांचे मलमूत्र हे पाण्यासोबत मिश्रित होऊन ह्या घाण पाण्याचा निचरा हा परिसरातील विहिरींना होऊन परिसरातील अनेकांना हगवण,उलटी,डेंगू,मलेरिया व टाफाईड सारख्या रोगाची लागण झाली आहे.त्याचप्रमाणे या जनावारांची विष्ठा उचलून जेथे संग्रहित केली जाते तिथे पाण्याची टाकी असून त्याचेच बाजूला लहान मुलांची अंगणवाडी आहे.त्यामुळे या घाणीचा व दुर्गंधीचा या लहान मुलांना संसर्ग होऊन ते आजारी पडण्याची दाट शक्यता आहे.व ही समस्या गत कित्येक वर्षांपासून सातगाववासी सोसत असून यावर उपाययोजना करण्यासंदर्भात येथील स्थानिक प्रशासनाला अनेकदा तोंडी व लेखी सूचना करूनही त्यांनी कुठलीही कार्यवाही केली नाही.

तर पाळीव प्राणी मालकानाही खूपदा विनंती करून गुरांना गोठ्यात बांधावे म्हणून आर्जव केला असता ते उलट उत्तरे देऊन “तुमच्याशी जे बनते ते करून घ्या” अशी अरेरावीची भाषा वापरतात तरी संबधित समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी येथील नंदेश वाघमारे,प्रमोद तराळे,रोहित शेळके,सुनील कामडी,उज्वल लाकडे,निखिल लाकडे,इंद्रजित पटले,मुरलीधर कैकाडी,आकाश शेळके,आकाश मसराम,रोहित गौरकर,समीर केळवदे,विक्की शेळके,अनिता रावळे, वर्षा सोनवणे,कविता नेवारे, दुर्गा टेकाम, मंगला कन्नाके,शिला नेवारे,छाया मोहनकर,अक्षय मोहनकर,सुनीता थुल सह शेकडो सातगाववासीयांनी केली.

– संदीप बलविर,बुटिबोरी