Published On : Tue, Aug 13th, 2019

पोलिसांनी दिले 9 गोवंश जनावरांना जीवनदान

कामठी : स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रमानगर रेल्वे क्रॉसिंग मार्गे अवैधरित्या गोवंश जनावरांची तस्कर बाजावर धाड घालण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त झाल्याची कारवाही काल मध्यरात्री दीड दरम्यान केली असून या धाडीतून कत्तलीसाठी अवैधरित्या नेत असलेल्या 9 गोवंश जनावरांना ताब्यात घेत जीवनदान देण्यात आले.तसेच या कारवाहितुन 9 गोवंश जनावरे व जप्त टाटा पिकअप वाहन असा एकूण 6 लक्ष 7 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपी पसार वाहनचालक व वाहनमालक विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहोतीनुसार सदर घटनास्थळ मार्गे टाटा योद्धा पिकअप वाहन क्र एम एच 49 डी 7989 ने कत्तलीसाठी 9 गोवंश जनावरे निर्दयतेने बांधून अवैधरित्या वाहून नेत असता नवीन कामठी पोलिसानी वेळीच सदर वाहनावर धाड घालून वाहनातील 9 ही गोवंश जनावरे ताब्यात घेऊन नजीकच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलविण्यात आले.संधी साधताच आरोपी वाहनचालकाने घटनास्थळाहुन पळ काढण्यात यश गाठले.यानुसार पसार आरोपी वाहनचालक व मालकाविरुद्ध कायदेशीर गुन्हा नोंदविण्यात आला असून या कारवाहितुन 6 लक्ष 7 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही यशस्वी कारवाही डीसीपी निलोत्पल , एसीपी राजेश परदेसी, पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनार्थ पीएसआय कांडेकर, डी बी स्कॉड चे ज्ञानचंद दुबे, मंगेश गिरो, वेदप्रकाश यादव, प्रमोद वाघ, निलेश यादव, पंकज , संदेश, श्रीकांत, अतुल राठोड यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

संदीप कांबळे कामठी