Published On : Tue, Aug 15th, 2023
By Nagpur Today Nagpur News

त्रिसूत्री अवलंबून लोकाभिमुख सुविधांवर भर देणार

स्वातंत्र्यदिनी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांचा संकल्प
Advertisement

नागपूर: नागपूर शहरामध्ये उत्कृष्ट पायाभूत सुविधा निर्माण करणे, मनपाच्या सुविधांमध्ये अधिक सुलभता प्रदान करणे आणि नागरिकांचे जीवनमान उंचावणे या त्रिसूत्रीचा अवलंब करून नागपूर शहरातील लोकाभिमुख सुविधांवर भर देणार, असा संकल्प मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला.

मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने ध्वजारोहणानंतर मनपा मुख्यालयातील हिरवळीवर आयोजित समारंभात ते बोलत होते.

Gold Rate
2 May 2025
Gold 24 KT 93,700/-
Gold 22 KT 87,100/-
Silver/Kg 95,400/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मंचावर अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाड, अतिरिक्त आयुक्त श्री. निर्भय जैन, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सदाशिव शेळके, उपायुक्त श्री. रवींद्र भेलावे, श्री. सुरेश बगळे उपस्थित होते.

पुढे बोलताना आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, नागपूर महानगरपालिकेद्वारे केंद्र शासन, राज्य शासन आणि मनपाच्या स्वनिधितून तसेच स्मार्ट सिटी मार्फत अनेक योजना राबविण्यात येत आहेत. या सर्व योजनांची योग्य अंमलबजावणी करून आले शहर ‘ग्लोबल सिटी’कडे नेण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान राबविण्यात येत आहे. अभियानातील पाचही उपक्रमांची शहरात अंमलबजावणी करण्यात आली आहे. याशिवाय १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये शहरवासीयांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहनही आयुक्तांनी केले.

नागरिकांना जन्मापासून तर मृत्यूपर्यंत इत्यंभूत सुविधा प्रदान करणारी महानगरपालिका ही एकमेव संस्था आहे. आपले अभियंते, डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, शिक्षक, स्वच्छता कर्मचारी हे सर्व महत्वाची जबाबदारी पार पाडत असून राष्ट्रीय उभारणीत हातभार लावत असल्याचा सार्थ अभिमान बाळगला पाहिजे. आपल्यावर असलेली जबाबदारी सर्वांनी व्यवस्थित पार पाडावी, असा प्रण घेण्याचे देखील आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी अधिकारी व कर्मचा-यांना केले.

कार्यक्रमाला निगम सचिव श्री. प्रफुल्ल फरकासे, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, डॉ. श्वेता बॅनर्जी, सहायक आयुक्त सर्वश्री मिलिंद मेश्राम, महेश धामेचा, प्रकाश वराडे, कार्यकारी अभियंता सर्वश्री अजय मानकर, गिरीश वासनिक, रवींद्र बुंधाडे, समाजविकास अधिकारी डॉ. रंजना लाडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, उद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपगार, क्रीडा अधिकारी श्री. पीयूष आंबुलकर आदी उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर मनपा आयुक्तांना मनपाच्या अग्निशमन पथकाने मानवंदना दिली. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी पथकाची मानवंदना स्वीकारली. यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. बी.पी. चंदनखेडे उपस्थित होते. अग्निशमन पथकाच्या तीन प्लाटूनमधील पहिल्या प्लाटूनचे नेतृत्व प्र. अग्निशमन अधिकारी श्री. भगवान वाघ, दुस-या प्लाटूनचे नेतृत्व प्र.उपअग्निशमन अधिकारी श्री. दिलीप चव्हाण आणि तिस-या प्लाटूनचे नेतृत्व प्र.उपअग्निशमन अधिकारी श्री. प्रकाश कावडकर यांनी केले.

कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी व मनपा शिक्षिका श्रीमती शुभांगी पोहरे यांनी केले. आभार जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी यांनी मानले.

शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा सत्कार

क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी राज्य शासनाकडून शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित नागपूर शहरातील खेळाडूंचा नागपूर महानगरपालिकेतर्फे सत्कार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू मालविका बन्सोड, बुद्धिबळपटू (दिव्यांग) मृणाली पांडे, राष्ट्रीय स्केटिंग खेळाडू अदिती धांडे, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू ग्रँड मास्टर संकल्प गुप्ता, आंतरराष्ट्रीय स्केटिंग खेळाडू कस्तुरी ताम्हणकर, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू ‌ऋतुजा तळेगावकर, जीजामाता पुरस्कार विजेत्या सॉफ्टबॉल खेळाडू दर्शना पंडीत आणि उत्कृष्ट मैदानी क्रीडा मार्गदर्शक संजय भोस्कर यांना मनपाद्वारे सन्मानित करण्यात आले. ग्रँड मास्टर संकल्प गुप्ता आणि जलतरणपटू ऋतुजा तळेगावकर यांचा सन्मान त्यांचे आईवडील श्री. संदीप गुप्ता व श्रीमती सुमन गुप्ता आणि श्री. भीमाशंकर तळेगावकर व श्रीमती मुक्ता तळेगावकर यांनी स्वीकारला. आयुक्त तथा प्रशासक श्री. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल व मान्यवरांनी सर्व सत्कारमूर्तींना मानाचा दुपट्टा, सन्मानचिन्ह आणि तुळशीरोप देउन सन्मानित केले.

यावेळी मनपाच्या आपली बस सेवेत कार्यरत वाहन चालक श्री. सुरेश नेहारे यांना ‘बेस्ट ड्रायव्हर विथ झिरो लेन डिपार्चर’ पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Advertisement
Advertisement