Published On : Mon, Mar 2nd, 2020

पशुपालन विषयावर जोर दिल्यास ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था दुरुस्त होणार:-पशुसंवर्धन मंत्री सुनीलबाबू केदार

ग्रामीण भागातील कष्टकरांच्या हाताला काम देण्यास सदैव तत्पर-सुनीलबाबू केदार

कामठी :- भारत हा कृषिप्रधान देश असून शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती असून शेतकऱ्यांचा जोडधंदा हा दुग्धव्यवसाय आहे .मागील काही वर्षापासून निसर्गाच्या अवकृपेमुळे येथील बळीराजा हवालदिल झाला असून शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलंमडल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे अशा कठीण परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या सोबतीला उभे असून शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून शेतकऱ्यांचे मनोबल मजबूत करीत आहे त्यातच कर्जमाफी करण्याच्या आश्वासनपूर्ती ला पूर्ण करीत 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी केल्याने शेतकऱ्यांच्या वतीने महाविकास आघाडी चे आभार मानत ग्रामीण भागातील कष्टकरी हाताच्या कामाला काम दिल्यास येथील ग्रामस्थ शहराकडे धाव घेत कामासाठी वणवण भटकंती करणार नाही तसेच शेतकऱ्यांचा जोडधंदा असलेल्या पशुपालणासह दुग्धव्यवसायावर भर दिल्यास ग्रामीण भागातील बिकट अर्थव्यवस्थेत सुधार होऊ शकते असे मौलिक प्रतिपादन पशुसंवर्धन , दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील बाबू केदार यांनी काल कामठी तालुक्यातील लिहिगाव येथे आयोजित कामठी तालुकास्तरीय भव्य पशुपक्षी प्रदर्शनी कार्यक्रमात व्यक्त केले.

तसेच शेतकऱ्यांनी बकरी चे दूध हे अतिशय पौष्टिक असून विविध प्रकारच्या रोगासाठी बकरीचे दुधाला महत्व असल्याने जोड धंद्यातून बकरी दुधाच्या व्यवसायासह बकरी पालन व्यवसायाला गती द्यावी असे मार्गदर्शन खासदार कृपाल तुमाणे यांनी केले तर शेतकऱ्यांनी जैविक शेती ही काळाची गरज असून जैविक शेती केल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी होईल तर रोगमुक्त आयुष्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय खताचा वापर करून विषमुक्त शेती करण्याचा सल्ला आमदार टेकचंद सावरकर यांनी केला तर शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी या प्रकारचे भव्य पशु पक्षी प्रदर्शन प्रत्येक तालुक्यासह गावागावात घ्यायला पाहिजे असे मत जी प अध्यक्षा रश्मीताई बर्वे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मीताई बर्वे, कांग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश महासचिव व माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर, जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेता अनिल निधान, कृषी पशुसंवर्धन सभापती तापेश्वर वैद्य, जिल्हा परिषद सदस्य प्रा अवंतिका लेकुरवाडे, जी प सदस्य नाना कंभाले, जी प सदस्य मोहन माकडे, कामठी पंचायत समिती चे सभापती उमेश रडके, उपसभापती आशिष मललेवार, पंचायत समिती सदस्य दिशाताई चनकापुरे, सुमेध रंगारी, दिलीप वंजारी, लिहिगाव ग्रा प सरपंच गणेश झोड, कांग्रेस चे पदाधिकारी ज्योती झोड, रमेश लेकुरवाडे, सरपंच प्रांजल वाघ, सरपंच मोरेश्वर उर्फ बंडू कापसे,कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष काशीनाथ प्रधान, सहाययक आयुक्त डॉ उमेश हिरुडकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ मंजुषा पुंडलिक , जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ अरविंद ठाकरे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी ,पशुधन विकास अधिकारी डॉ लीना पाटील, पशुधन पर्यवेक्षक डॉ रमेश गोरले , माजी सभापती सेवक उईके, सचिव उनचेकर, केम ग्रा प उपसरपंच अतुल बाळबुधे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

या तालुका स्तरीय भव्य पशुपक्षी प्रदर्शनी चे उदघाटन पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले याप्रसंगी प्रदर्शनासाठी आणलेले संकरित वासरे, गायी, म्हशी, कोंबडे ,बकऱ्या, शेळी , बोकुड, देशी गाई आदींची पाहणी केल्या नंतर संकरित वासरांचा गट, संकरित कालवडी, संकरित गाई, वळू , बैल, देशी गाई, म्हैस, शेळी, बोकुड, कुक्कुटपक्षी या दहा गटामधून निवड झालेले प्रति गटातील प्रथम , द्वितीय, तृतीय क्रमांकाने असलेले क्रमशः 3 हजार, 2 हजार, 1 हजार असे 60 हजार रुपयाचे धनादेश वितरण करण्यात आले तसेच लिहिगाव येथील संकरित कालवडी साठी पुरस्काराचे मानकरी ठरलेले प्रकाश ठाकरे यांना चॅम्पियन ट्रॅफि सोबत 50 किलो पशुखाद्य असा विशेष पुरस्कार देण्यात आला.

कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कामठी पंचायत समिती चे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, पशुधन विकास अधिकारी डॉ लीना पाटील, पशुधन विकास अधिकारी डॉ प्रीती शिरसाट, , डॉ श्रद्धा वासनिक, डॉ वौशाली चलपे, डॉ मंगला टीचकुले, डॉ प्रदीप येवतकर, डॉ रुपेश खोडनकर तसेच परिचर शंभरकर, वाणळे, नागपुरे, बोरकर, श्रीरामे, मेंढे, झाडे, काटेखाये यांनी केले असून कार्यक्रमाचे संचालन व आभार पशुधन विकास अधिकारी डॉ लीना पाटील यांनी केले.

संदीप कांबळे कामठी