Published On : Mon, Mar 2nd, 2020

भाटीया लॉन मधून 1 लक्ष 18 हजार रुपयांची चोरो

कामठी :;स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी-नागपूर महामार्गावरील भाटीया लॉन येथे आयोजित लग्न संमारंभात सहभागी होण्यास आलेले नागपूर रहिवासी फिर्यादी विनोद पांडे यांच्या पत्नीच्या गळ्यातील 1लक्ष 10 हजार रुपये किमतीचे असलेले सोन्याचे मंगळसूत्र, विनोद पांडे यांचा 5 हजार रुपये किमतीचा एक जुना वापरता मोबाईल तसेच नीरज निकोसे यांच्या खिशातील नगदी 3 हजार रुपये असा एकूण 1 लक्ष 18 हजार रुपयांची चोरी अज्ञात चोरट्याने केली असून यासंदर्भात फिर्यादी विनोद पांडे यांनी स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी कलम 379 अनव्ये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांडेकर करीत आहेत

संदीप कांबळे