Published On : Mon, Apr 5th, 2021

प्रशासनाच्या मनमानी विरोधात अंगणवाडी सेविका,मदतनीस , आशा सेविकांचा एल्गार

….विभागीय आयुक्तांचा रोखला ताफा

कामठी :-सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढीवर असून दैनंदिन मृत्यू होत आहेत या कोरोनाबधित रुग्णांना आरोग्य सेवा देण्यासह त्यांची आरोग्य काळजी घेण्याचे मुख्य कार्य हे त्या परीसारतील आशा वर्कर आपल्या कर्तव्यदक्ष भूमिकेतून करीत असतात यावेळी कोरोणाबधित रुग्णाशी आशा वर्कर थेट संबंध गाठत असल्याने आशा वर्कर सुद्धा बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा या आशा वर्कर ला देण्यात येणाऱ्या सुरक्षात्मक किट ह्या पूर्णपणे देत नसून मागील तीन महिन्यांचे मानधन सुद्धा देण्यात आले नाही त्यातच लसीकरण संबंधात अंगणवाडी सेविका व मदत्नीसकडून करण्यात येणारे सर्वेक्षण करतेवेळी सुद्धा कोरोनाबधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही।नुकतीच एक अंगांवडीवसेविका चा कोरोनाने मृत्यू झाला असून एक अंगणवाडी सेविका खाजगी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत आहे.

मृतक अंगणवाडी सेवीकेला देण्यात येणारा हा 50 लक्ष रुपयाचा विमा कवच हा कागदोपत्रच मर्यदित असल्याने नाईलाजास्तव विमा लाभापासून वंचित होण्याची पाळी आली आहे .तेव्हा या कोरोना महामारीच्या काळात तुटपुंज्या मानधनावर सेवा देणाऱ्या आशा वर्कर ह्या शासनाकडून मिळत असनारे मानधन, सुरक्षात्मक दृष्टिकोनातुन देणात येणाऱ्या किट त्यातच 50 लक्ष रुपयाचा विमा हा फक्त नामधारी असल्याने प्रशासनाच्या मनमानी विरोधात आशा वर्कर तसेच अंगणवाडी सेविकानी आज सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडला तसेच आपल्या व्यथा सांगण्यासाठी विभागीय आयुक्त संजीवकुमार तसेच मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याकडे धाव घेतली असता यांनी या आशा वर्कर कडे दुर्लक्ष पुरवीत वाहनात बसून जाण्याच्या बेतात असताच सर्व उपस्थित महिलांनी विभागोय आयुक्तांच्या ताफ्यासमोर आडव्या होऊन ताफा थांबविला.

हा एल्गार सुरू असताना काही आशा वर्कर यांना अश्रू आवरले नसल्याने आमच्या न्यायिक मागण्या कोण पूर्ण करणार?आम्ही कोरोनाने मरण पावल्यास आमच्या कुटुंबियांचा वाली कोण?असाही टाहो टाहो फोडला…..