Published On : Tue, Jun 12th, 2018

मेट्रो रेल्वे आणि देखभाल दुरस्तीसाठी बुधवारी वीज पुरवठा बंद राहणार

Nagpur Metro, Majhi Metro

नागपूर: अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी तसेच मेट्रो रेल्वेच्या कामासाठी बुधवार दिनांक १३ जून २०१८ रोजी दक्षिण-पश्चिम नागपुरातील अनेक नागरी भागात सकाळच्या वेळी वीज पुरवठा बंद राहणार आहे.

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सकाळी ८ ते ११ या वेळेत मालवीय नगर,योगक्षेम ले आऊट, खामला, स्नेह नगर, बजाज नगर, दंडिगे ले आऊट, शंकर नगर, काछीपुरा, खरे टाउन, भगवाघर ले आऊट, अलंकार टॉकीज परिसर,सुजाता ले आऊट, आझाद हिंद नगर, जीवन छाया नगर, स्वालंबी नगर, इंद्रप्रस्थ नगर, टेलिकॉम नगर, रवींद्र नगर, संघर्ष नगर, शारदा नगर, रमाबाई आंबेडकर नगर, जनहित सोसायटी, प्रज्ञा ले आऊट, दाते ले आऊट, लोखंडे नगर, पठाण ले आऊट, सरस्वती विहार, कामगार कॉलनी, बंडू सोनी ले आऊट, कॉसमॉस टाउन येथील वीज पुरवठा बंद राहील.

सकाळी ७ ते ११ या वेळेत रामदासपेठ कॅनॉल रोड, झाशी राणी चौक, मुंजे चौक, संगम चाल, जानकी टॉकीज, हनुमान गल्ली, शनी मंदिर, कुंभार टोळी, तेलीपुरा, कोष्टींपुरा तर सकाळी ९ ते ११ या वेळेत नागपूर विद्यापीठ परिसर, अमरावती रोड, हिल टॉप, वर्मा ले आऊट, अंबाझरी टेकडी, उत्तर अंबाझरी मार्ग, कन्नमवार नगर, कर्वे नगर, उज्वल नगर येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे.

वीज पुरवठा बंद राहणार असलेल्या भागातील वीज ग्राहकांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर याची माहिती देण्यात येणार आहे.