Published On : Sat, Sep 16th, 2017

प्रत्येक सेकंदाला वीज आवश्यक : ऊर्जामंत्री बावनकूळे

Advertisement


नंदुरबार: वीज ही रक्तवाहीनी असून २१ व्या शतकात प्रत्येक सेकंदाला वीज आवश्यक आहे. तसेच वीजवापरातून आता श्रीमंती ठरत आहे. दुसरीकडे १९ लाख कुटूंबाकडे आजही वीज नाही ,ही खंत ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केली.नंदुरबारातील दीनदयाल ग्रामज्योती व एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतील ५ उपकेंद्राच्या भुमिपुजनप्रसंगी ते बोलत होते.

राजपुत लॉन्स नंदुरबार येथे झालेल्या या कार्यक्रमाला मा.डॉ.खा. हिनाताई गावीत, मा.आ. श्री. चंद्रकांत रघुवंशी, मा.आ.श्री.डॉ. विजयकुमार गावीत, मा.आ.ॲड.के.सी.पाडवी ,मा.श्री. उदेसिंग पाडवी, आमदार श्री. शिरीष चौधरी,श्री.विजय चौधरी, श्री.औरंगाबाद प्रादेशिक विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक मा.श्री.ओमप्रकाश बकोरिया, , जळगांव परिमंडळाचे मुख्य अभियंता मा.श्री.ब्रिजपालसिंह जनवीर, अधिक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) मा.श्री.अशोक साळुंखे अधिक्षक अभियंता मा.श्री.राजेशसिंग चव्हाण, आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या प्रसंगी बोलताना ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले जनतेला किमान शाश्वत वीज मिळाली पाहिजे ही शासनाची भुमिका आहे.आतापर्यंत पुरेशी वीज या राज्याकडे उपलब्ध होती.पण कोळशाच्या अडचणीमुळे ८ ते १५ दिवस भारनियमन राहणार आहे. शेवटी अखंडीत आणि सुरक्षित वीजपुरवठा करण्यासाठी वितरण प्रणाली मजबुत करणे आवश्यक आहे.अधिका-यांनी चांगले काम केल्यामुळेच ३० मार्च रोजी आपण २४ हजार मेगावॅटचे यशस्वी वितरण व पारेषण करू शकलो.महावितरण व पारेषणचे जाळे उभे करण्यासाठी दीर्घकाळ लागणार आहे.जनतेने आपल्याला संधी दिली आहे. आपण आपल्याकडून जास्तीत जास्त ग्राहकांची सेवा करणार आहेत.

महावितरणच्या सर्व शाखा अभियंत्यानी दर महिन्याला ग्राहक संवादाचे कार्यक्रम घेण्याचे निर्देश देउन ऊर्जामंत्री म्हणाले.जो अभियंता ग्राहक संवाद मेळावा घेणार नाही त्याने महावितरणमध्ये रहायचे की नाही हे ठरवायचे आहे.कार्यकारी अभियंत्यानी औद्योगिक व वाणिज्य ग्राहकांचे संवाद कार्यक्रम घ्यावे अन्यथा गोपनीय अहवालात नोंदी घेणार असल्याचे ऊर्जा मंत्री म्हणाले.

महावितरणे ९० टक्के अधिकारी असूनही मुख्यालयी राहत नसल्याचे सांगताना ऊर्जामंत्री म्हणाले,मुख्यालयी न राहता आपण घरभाडे भत्ता घेतो.आपण कुणाची फसवणूक करीत आहोत याचे आत्मपरिक्षण करा. अभियंत्याच्या व लाईनमनच्या हलगर्जीपणामुळे कोणाचाही जीव जाणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे.प्रशासनातील अडचणी सोडवू पण ग्राहकांशी छेडखानी खपवून घेणार नाही असा इशारा ऊर्जामंत्र्यांनी यावेळी दिला.जिल्ह्यात ११७ कोटीची कामे सुरू आहेत .पण २०३० पर्यंत या जिल्ह्याला कोणतीही वीजेची समस्या भेडसावू नये म्हणून ६० कोटी आणखी खर्च करण्यात येणार आहे, असेही ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले.


श्री. चंद्रकांत रघुवंशी
ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या या दौऱ्यामुळे ग्रामीण भागात नवचैतन्याचे वातावरण तयार झाल्याने सांगून आ.चंद्रकांत रघुवंशी म्हणाले मराविमं बद्दल कधीच समाधान होऊ शकत नाही. राज्य प्रगतीकडे वाटचाल करीत असताना लोकांच्याही अपेक्षा वाढतात रस्त्यावरील पोल हटवने, लोंबकलेल्या तारा नीट करणे, रोहित्र स्थलांतरित करणे या कामांसाठी एखादी योजना या आधी मागणी करुन ते म्हणाले शेतकऱ्यांसाठीचांगली योजना द्या, असेही आ. रघुवंशी म्हणाले.

डॉ. विजयकुमार गावीत
ऊर्जामंत्री बावनकुळे हे ऑन द स्पॉट तक्रारी सोडवणारे मंत्री आहेत, असे सांगताना आ. डॉ. विजयकुमार गावीत म्हणाले, सर्व समाजाच्या अडी अडचणी समजुन घेउन त्या सोडवून देण्याचा ते प्रयत्न करतात. लोकांना वीज स्वस्त पडेल, अशी योजना ते आखत आहेत. नवीन उपकेंद्र मंजुर केले ते केल्यामुळे कमीदाबाने वीजपुरवठा होणार नाही. मुख्यमंत्री सौरकृषी योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी जमीन उपलब्ध करुन द्या. त्यामुळे शेतातच आपल्याला वीज मिळणार आहे. लोकंच्या घरावरुन वीज जाणार नाही. खाजगी भूखंडावरुन गेलेले वीज तार हटवण्याचा निर्णय घेतला. लोकांचे बारीक सारीक अडचणी जाणून घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करतात. आपल्या जिल्ह्याला त्यांनी भरभरुन दिले असल्याचे ही डॉ.विजयकुमार गावीत म्हणाले.

खा.डॉ. हिनाताई गावीत
जिल्हयातील कमी दाबाचा प्रश्न सोडविण्यासाठी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी विविध ठिकाणी उपकेंद्र दिले असल्याचे सांगुन खासदार हिनाताई म्हणाल्या सुरवाणी येथील १३२ केव्हीचे उपकेंद्रामुळे द-याखो-यामधील अदिवासी पाड्यांमधील अंधार दुर होणार आहे. ८७ गावे व ९६३ अदिवासी पाड्यांना वीजपुरवठा करण्याची मागणी खासदार गावीत यांनी केली. ऊर्जामंत्र्याच्या अदिवासी गावांमध्ये वीज पोहचण्याचे काम सुरू झाले.मोदलपाडामुळे येथील उपकेंद्रामुळे या भागातील १४ गावातील अंधार दूर होईल.कमी दाबाचा वीजपुरवठा यांना राहणार नाही.प्रत्येक तालुक्यात ऊर्जामंत्र्यांनी उपकेंद्र मंजुर केले आहे.दोंडाईचा जवळ असलेल्या डोंगरावर सोलर पार्क करता येण्यासारखा आहे.सन २०३० चे लक्ष ठेवून २२० केव्हीचे उपकेंद्र नंदुरबार येथे करण्याचे नियोजन ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी केले असल्याने वीजेचे प्रश्न निश्चितच सुटणार असल्याचेही खासदार हिना गावीत म्हणाल्या.