नागपूर: स्थानिक स्वाती बंगला, सिविल लाइन्स येथे नागपूर प्रेस क्लबचे उद्घाटन आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, नौवहन, जलसंसाधन, नद्याविकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्री श्री.नितीन गडकरी , नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष श्री. प्रदीप कुमार मैत्र, सचिव श्री. त्रिपाठी प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपूर प्रेस क्लबच्या उद्घाटनप्रसंसगी आयोजित कार्यक्रर्माप्रसंगी बोलतांना श्री. गडकरी यांनी मुंबई, दिल्ली सारख्या प्रेस क्लबची गरज नागपूरला होती.यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला व कमी खर्चात आणि कमी वेळात एका पडीक अशा जागेचा कायापालट झाला, असे सांगितले. नागपूर प्रेस क्लबमध्ये पत्रकारांना त्त्यांच्या धकाधकीच्या आयुष्यातून चिंतन, मनन करण्याची संधी या प्रेस क्लबच्या माध्यमातून मिळणार आहे. यामध्ये डिजिटल लायब्ररीचा समावेश असावा ज्याने पत्रकारांना अद्ययावत माहिती मिळेल, असेही त्यांनी यावेळी सुचविले. याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी या प्रेस क्लबच्या जागेच्या दिर्घ मुदतीच्या (लॉंग़ टर्म ) लिजसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही दिले. नागपूरात विधीमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने येणा-या देशभरातील पत्रकारांना प्रेस क्लबमुळे सुविधा उपलबध होणार आहे. प्रेस क्लबप्रमानेच नागपूरातील टिळक पत्रकार भवनालाही बदलत्या काळानुरुप आधुनिक व स्मार्ट करण्याची गरज आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
नागपूर प्रेस क्लब निर्मितीमागचा प्रवास नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष श्री. प्रदीप कुमार मैत्र यांनी यावेळी उपस्थितांसमोर मांडला. मुख्यमंत्री व जिल्हा प्रशासनाच्या सक्रीय सहभागामूळे प्रेस क्लबची उभारणी झाली. यामध्ये 4 गेस्ट हाऊसची निर्मिती झाली असून पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टिने एक प्रशस्त जिमसुद्धा प्रस्तावित आहे. एक शाश्वत प्रारूप या प्रेस क्लबच्या माध्यमातून पत्रकारांना देणे, हा आपला उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी नागपूर प्रेस क्लबची सर्वप्रथम पेट्रॉन सदस्यता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, श्री. गडकरी यांना देण्यात आली . तसेच पत्रकारामधून श्री. प्रदीप मैत्र यांनी ही सदस्यता नागपूर प्रेस क्लबचे पदाधिका-यांच्या हस्ते देण्यात आली.
या कार्यक्रमास नागपूर प्रेस क्लबचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, राज्यसभा खासदार श्री. अजय संचेती, महापौर श्रीमती नंदा जिचकार व नागपूरातील पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.