Published On : Thu, Feb 13th, 2020

वीज चोरी प्रकरणी ग्राहकाला ९४०० रुपये दंड

Advertisement

झाडाच्या फांद्याचा फायदा घेत सुरु होती वीज चोरी ,
काटोल -वीज वितरण विभाग काटोल शहर भाग दोन अंतर्गत येणारे वीज ग्राहक मेहमदुल्ला रह्मेदुल्ला पठाण यांच्या घरासमोरील वाढलेले झाड वीज वितरण विभागाचे कर्मचारी कापन्याकरिता गेले असता मुख्य वीज लाईनवर पठाण यांची वायर टाकून अवैध रित्या वीज घेतल्याचे निदर्शनात आले यावर वितरण विभाने कारवाई करित ग्राहकाला वीज चोरी प्रकरणी ९४०० रुपयाचा दंड थोटावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सावरगाव रोड मुख्य मार्गावर वीज तार एकमेकांना स्पर्श होत असल्याने स्पार्किंग होत असून यामुळे व्होल्टेज चा प्राब्लेम होत असल्याची तक्रार वीज वितरण काटोल शहर भाग दोन विभागाला प्राप्त झाली होती तक्रार प्राप्त होती त्यानुसार रविवारला वीज वितरण कर्मचाऱ्यानी स्पार्किंग स्थळ गाठले याठिकाणी पठाण यांच्या घरासमोरील झाडाच्या फांद्या मुख्य लाईन तारांवर गेल्याने हा प्रकार होत असल्याचे लक्षात आले वाढलेल्या झाडाच्या फांद्या कापले असता वीज तारांवर दोन ताराचे आकोडे टाकल्याचे आढळले शहानिशा केली असतां याचे थेट कनेक्शन पठाण यांच्या घरी जोडले असल्याचे निष्पन्न झाले वीज ग्राहक घरी नसल्याने या प्रकारचे छायाचित्रीकरण करण्यात आले वितरण विभागाच्या कलम १३५ अंतर्गत पठाण यांचेवर गुन्हा दाखल करून नियमानुसार त्यांच्या विल काढून ७४०० व २००० अश्याप्रकारे ९४०० रुपयाचा दंड आकारण्यात आला हि कारवाई सह्यक अभियंता बब्लू प्रसाद यांच्या मार्गदर्शनात प्रधान तंत्रज्ञ प्रमोद ठाकरे,टेक्नेशियन पंकज पाचपोहर यांही केली.

फोटो वीज वितरण विभागाचे कर्मचारी झाड कटाईला गेले असता वीज ग्राहक पठाण यांचा अवैध रित्या वीज चोरी करीत असल्याचे निदर्शनात आले.