Published On : Thu, Feb 13th, 2020

संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती साजरी

कन्हान : – संत शिरोमणी रविदास नवयुवक समिती कांद्री-कन्हान व्दारे येथे संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

कांद्री येथे जि प नागपुर अध्यक्षा सौ रश्मीताई बर्वे यांंच्या हस्ते व प्रल्हाद हटिले यांंच्या अध्यक्षेत संत शिरोमणी रविदास महाराज यांंच्या प्रतिमेला माल्या र्पण व दिप प्रज्वलित करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

याप्रसंगी नाग पुर ग्रामीण कॉग्रेस कमेटी उपाध्यक्ष नरेश बर्वे, सरपंच बळवंत पडोळे, समुंद्रे कुमरे, न प कन्हान माजी नगराध्यक्षा अॅड आशाताई पनिकर, माजी सरपंचा आशा ताई कनोजे, नागपुर समाज समिती प्रमुख ताराचंद छत्री, बाबुलाल प्रसाद, अशोक जैस्वाल, राम प्रसाद जैस्वाल, हरिराम भारती आदी मान्यवर प्रामुख्या ने उपस्थित होते. संत रविदास महाराज यांचा जीवनावर प्रकाश टाकीत मान्यव रानी मार्गदर्शन केले. महाप्रसाद वितरण करून जंयती साजरी करण्यात आली.