Published On : Mon, Jul 29th, 2019

नागपुरातील ‘इलेक्ट्रिक चार्जींग स्टेशन’ प्रकल्प पथदर्शी : महापौर नंदा जिचकार

Advertisement

इलेक्ट्रिक चार्जींग स्टेशनचे उद्‌घाटन : लवकरच होणार दरनिश्चिती

नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे क्रांतीपुरुष आहेत. त्यांच्या संकल्पनेतून नागपूर शहर शाश्वत विकासाकडे झेप घेत आहे. कविवर्य सुरेश भट सभागृहात निर्मित इलेक्ट्रिक वाहन चार्जींग स्टेशन हा पथदर्शी प्रकल्प आहे. सभागृहात सौर ऊर्जा निर्माण करून त्या माध्यमातून चार्जींग स्टेशनद्वारे इलेक्ट्रिक वाहने चार्ज करणे, अशी संकल्पना केवळ ना. नितीन गडकरीच मांडू शकतात, अशा शब्दात गौरव करीत महापौर नंदा जिचकार यांनी नागपुरात होत असलेल्या चौफेर विकासकामांवर प्रकाश टाकला.

Gold Rate
10 july 2025
Gold 24 KT 97,000 /-
Gold 22 KT 90,200 /-
Silver/Kg 1,07,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात निर्माण करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक चार्जींग स्टेशनच्या उद्‌घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. मंचावर महापौर नंदा जिचकार यांच्यासह आमदार सुधाकर कोहळे, आमदार डॉ. मिलिंद माने, उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे, मनपातील भाजपच्या प्रतोद दिव्या धुरडे, महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गिऱ्हे, स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती अभय गोटेकर, हनुमाननगर झोन सभापती माधुरी ठाकरे, नेहरूनगर झोन सभापती समिता चकोले, अग्निशमन व विद्युत समितीचे उपसभापती ॲड. निशांत गांधी, नगरसेवक संजय चावरे, राजेश घोडपागे, नगरसेविका मंगला खेकरे, रूपाली ठाकूर, विशाखा बांते, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता अजय मानकर, एनर्जी ऑडिटर संजय जैस्वाल, एनर्जी मॅनेजर सलीम इकबाल, कनिष्ठ अथिंता प्रकाश रुद्रकार, गजेंद्र तारापुरे, श्यामसुंदर ढगे, प्रदीप खोब्रागडे, प्रशांत काळबांडे, सुनील नवघरे, यांत्रिकी अभियंता (कारखाना) योगेश लुंगे, एम. एम. सोलर प्रा. लि.चे देवेंद्र रानडे, श्याम रानडे उपस्थित होते.

उद्‌घाटक म्हणून पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, विकासाची व्याख्या आता बदलली आहे. केवळ सिमेंट रस्ते अथवा पूल बांधणे म्हणजे विकास नाही. विकास शाश्वत असायला हवा. नागपूर शहर आता शाश्वत विकासाच्या दृष्टीने पुढे चालले आहे. नागपुरात तयार झालेले इलेक्ट्रिक चार्जींग स्टेशन हा शाश्वत विकासाचा पथदर्शी प्रकल्प आहे. अशा पथदर्शी प्रकल्पांमुळे वेगाने शाश्वत विकास होत असलेल्या जगातील प्रमुख पाच शहरांमध्ये नागपूरचे नाव असल्याचे त्यांनी सांगितले. वायुप्रदुषणामुळे अनेक आजार होतात. शुद्ध हवा मिळण्यासाठी ना. नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात नागपूर महानगरपालिका अनेक प्रकल्प राबवित असून त्यासाठी मनपा कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी बोलताना आमदार सुधाकर कोहळे म्हणाले, इलेक्ट्रिक चार्जींग स्टेशनचे उद्‌घाटन ही शहरासाठी अभिमानाची बाब आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडलेली संकल्पना साकार करण्याकरिता मनपाने जो पुढाकार घेतला, त्याबद्दल त्यांनी मनपाचे कौतुक केले. भविष्यात नागपूर शहरातून पेट्रोल-डिझेलच्या गाड्या बाद होऊन इलेक्ट्रिक अथवा बॅटरी ऑपरेटेड वाहने चालतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

तत्पूर्वी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते इलेक्ट्रिक चार्जींग स्टेशनचे फीत कापून उद्‌घाटन करण्यात आले. इलेक्ट्रिक बस चार्जींग करण्याअगोदर महापौर नंदा जिचकार व अन्य मान्यवरांनी पूजन केले. इलेक्ट्रिक चार्जींग स्टेशन उभारणाऱ्या एम.एम. सोलर प्रा.लि.चे देवेंद्र रानडे आणि श्याम रानडे यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन गिरीश देशमुख यांनी केले. आभार अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी मानले.

लवकरच होणार दरनिश्चिती
सदर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनची क्षमता ५० किलो वॉट इतकी असून, यात तीन प्रकारच्या वेगवेगळ्या प्रोटोकॉलचे वाहन चार्ज करण्याची सोय आहे. CCS आणि CHdeMo हे DC प्रकारचे चार्जर व एक AC चार्जर असे तीन चार्जिंग प्रोटोकॉल आहेत. २५ किलोवाट बॅटरी असलेले वाहन DC चार्जिंगद्वारे साधारण २० ते २५ मिनिटात चार्ज केल्या जाऊ शकेल. इलेक्ट्रिक बस चार्जींग करण्याकरिता त्या बसमधील बॅटरीच्या क्षमतेनुसार सुमारे अर्धा ते दीड तास चार्जींगकरिता लागेल, अशी माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता अजय मानकर यांनी दिली. चार्जींगसाठी शासन निर्देशानुसार विद्युत मंडळाच्या दरातील सवलत विचारात घेऊन दरनिश्चिती करण्यात येईल आणि लवकरच चार्जींग स्टेशन जनतेसाठी खुले करण्यात येईल, अशी माहिती गिरीश देशमुख यांनी दिली.

Advertisement
Advertisement