Published On : Sat, Sep 25th, 2021

बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे जयंतीनिमित्त भाजपातर्फे अभिवादन

नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी, राज्यसभेचे माजी सभापती बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रदेश सचिव ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी अभिवादन केले.

इंदोरा चौक येथील बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला भाजपा प्रदेश सचिव ॲड धर्मपाल मेश्राम यांनी पुष्पमाला अर्पण केली.

यावेळी शंकर मेश्राम, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा नागपूर शहर अध्यक्ष राजेश हाथीबेड, रिपाई आठवले गटाचे शहराध्यक्ष बाळासाहेब घरडे, विराग राऊत, रोहन चांदेकर, आनंद अंबादे, अशोक डोंगरे, नितिन वाघमारे, जगदीश बामनेट, धंनजय कांबळे, अविनाश धमगाये, रोशन बरमासे, नेताजी गजभिये, बंडू पारवे आदी उपस्थित होते.