Published On : Tue, Nov 12th, 2019

रामटेक येथे ईद-ए-मिलाद उत्साहात संपन्न

रामटेक: इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस जशने ईद मिलादुन्नबी रामटेक नगरीत तसेच बस स्टॉप परिसरात साजरा करण्यात आला.रामटेक येथील व परिसरातील मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या तसेच हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रदर्शन केले.

Advertisement

बस स्टॉप वरून सुभाष वार्ड ,टिळक वॉर्ड,रामाळेश्वर वॉर्ड,किसान चौक,नेहरू वॉर्ड ,गांधी चौक ह्या मुख्य मार्गाने मिरवणूक निघाली. मिरवणुकीत लहान मुले आबालवृद्ध बहुसंख्येने उपस्थित होते. सगळेच आनंदी वातावरनात हिंदू बांधवांना शुभेच्छा देत मार्ग आक्रमित होते.

Advertisement

मिरवणूकित अक्रम शेख,डॉ अनवर छवारे,डॉ गनी,हुसेनभाई मालाधारी,सरदार शेख,असलम शेख,सलीम अगवान,फिरोज छवारे,शफी शेख,अकरम छवारे,आरिफ मालाधारी,वसीम खान,महोम्मद खान,मोहम्मद पठाण,इस्राइल शेख,जाकीर कुरेशी, युनूस पठाण,डॉ. मिनाज कुरेशी,बाबा मालाधारी,लतीफ कुरेशी,अनु बेग,जम्मू कुरेशी तसेच मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी शांती व सौहार्दाचे वातावरण तयार केले.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement