नागपूर,: महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी (ता.१ मे) मनपा मुख्यालयात महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते ध्वज वंदन झाले. यावेळी डॉ. चौधरी यांनी 66 व्या महाराष्ट्र स्थापना दिन आणि 1 मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांना दिल्या. संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. महापालिकेच्या सेवा लोकाभिमुख आणि जागतिक दर्जाच्या करण्याचा प्रयत्न आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त (सेवा) श्रीमती वैष्णवी बी., अतिरिक्त आयुक्त (सामान्य) श्री. अजय चारठाणकर, मुख्य वित्त व लेखा अधिकारी श्री. सदाशिव शेळके, उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम, उपायुक्त श्रीमती डॉ. रंजना लाडे, उपायुक्त श्री. अशोक गराटे, परिवहन व्यवस्थापक श्री.विनोद जाधव, उपायुक्त श्री. गणेश राठोड, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. बी.पी. चंदनखेडे, शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले की, देशाच्या विकासात महाराष्ट्राचा मोठा वाटा राहिला आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अग्रणी राहिलेल्या महाराष्ट्राने स्वातंत्र्यानंतर देशाच्या उभारणीत मोठे योगदान दिले आहे. भाषावार प्रांतरचनेनुसार महाराष्ट्राची निर्मिती झाली. सामाजिक सुधारणा, उद्योग, कला, साहित्य, विज्ञान-तंत्रज्ञान या क्षेत्रात महाराष्ट्र नेहमी अग्रणी राहिला आहे. तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राची अर्थव्यवस्थाही मोठी राहिली आहे. भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरच्या दिशेने अग्रेसर होत आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलरच्या दिशेने वाटचाल करीत असून यात नागपूरचा वाटा महत्त्वपूर्ण राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राज्याच्या सर्वच क्षेत्रात नागपूरने भरपूर योगदान दिले आहे. राज्याचे ग्रोथ सेंटर म्हणून नागपूर शहर विकसित झाले आहे. शहराच्या विकासासाठी महत्वाची पालकसंस्था म्हणून नागपूर महानगरपालिका कार्यरत आहे. महापालिकेचा 75 वा स्थापना दिवस आणि संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरे करीत असल्याचेही डॉ. चौधरी म्हणाले.
शहरातील सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी महापालिका सतत प्रयत्नशील असल्याचे सांगून ते म्हणाले, महापालिकेच्या सेवा अधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न आहे. तसेच या सेवा जागतिक दर्जाच्या करण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात येत असेही डॉ. अभिजीत चौधरी यांनी याप्रसंगी सांगितले.
यावेळी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू, शहरातील विविध ठिकाणी आपात्कालिन प्रसंगी महत्वपूर्ण कर्तव्य बजावणारे अग्निशमन दलाचे जवान तसेच तेजस्विनी महिला मंचच्या श्रीमती किरण मुंधडा यांचा सत्कार महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला. सर्व सत्कारमूर्तींना मनपाचा मानाचा दुपट्टा, सन्मानचिन्ह आणि संविधानाची उद्देशिका प्रदान करुन गौरविण्यात आले.
यावेळी सहायक आयुक्त श्री. श्याम कापसे, सहायक आयुक्त श्री.हरीश राऊत, सहायक आयुक्त श्री. प्रमोद वानखेडे, श्री.सतीश चौधरी, श्री. पारितोष कंकाळ, सहायक आयुक्त श्रीमती स्नेहलता कुंभार, सहायक आयुक्त श्रीमती सोनम देशमुख, सहायक आयुक्त श्री.विजय थूल, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, उद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपगार, क्रीडा अधिकारी डॉ. पियूष आंबुलकर सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक श्री. राजकुमार मेश्राम यांच्यासह मोठ्या संख्येत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी व सहायक शिक्षिका श्रीमती शुभांगी पोहरे यांनी केले. आभार जनसंपर्क अधिकारी श्री मनीष सोनी यांनी मानले.
याप्रसंगी मनपाचे संगीत शिक्षक प्रकाश कलसिया, कृणाल दहेकर (तबला) आणि कमलाकर मानमोडे (हार्मोनियम), उमेश पवार यांनी राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर केले.
सेल्फी पॉईंटवर आयुक्तांनी काढली सेल्फी
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिन समारंभ प्रसंगी मनपा मुख्यालयातील हिरवळीवर असलेल्या 75 व्या वर्धापन सेल्फी पॉइंटवर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सेल्फी काढली.