Published On : Wed, Mar 11th, 2026
By Nagpur Today Nagpur News

गॅस टंचाईचा रेल्वे केटरिंगवर परिणाम;ट्रेनमधील शिजवलेले जेवण तात्पुरते बंद होण्याची शक्यता!

स्टेशनवरील स्टॉल्सना इंडक्शन-मायक्रोवेव्हचा पर्याय!
Advertisement

नागपूर -देशात निर्माण झालेल्या एलपीजी गॅस टंचाईचा परिणाम आता रेल्वे व्यवस्थेवरही दिसू लागला आहे. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण-अमेरिका आणि इस्रायल संघर्षामुळे ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला असून एलपीजीच्या पुरवठा साखळीत अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे अनेक भागांमध्ये गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ५ मार्च रोजी अधिसूचना काढून व्यावसायिक वापराच्या एलपीजीवर काही निर्बंध लागू केले आहेत. सिलिंडर मिळण्यात विलंब होत असल्याने अनेक ठिकाणी नागरिकांनी गॅस एजन्सीसमोर रांगा लावल्याचे चित्र दिसले. या परिस्थितीचा फटका रेल्वे स्थानकांवरील स्टॉल आणि केटरिंग सेवा चालवणाऱ्या व्यावसायिकांनाही बसू लागला आहे.

Gold Rate
Mar 10, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,61,800/-
Gold 22 KT ₹ 1,50,500 /-
Silver/Kg ₹ 2,76,300/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आयआरसीटीसीचे नवीन निर्देश-
एलपीजी टंचाई लक्षात घेऊन Indian Railway Catering and Tourism Corporation ने रेल्वे स्थानकांवरील केटरिंग युनिट्ससाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. संभाव्य गॅस कमतरतेची भरपाई करण्यासाठी स्टॉल चालक आणि केटरिंग ऑपरेटरना मायक्रोवेव्ह, इंडक्शन कुकटॉप यांसारख्या विद्युत उपकरणांचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच प्रवाशांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी रेडी-टू-ईट खाद्यपदार्थांचा पुरेसा साठा ठेवण्यासही सांगण्यात आले आहे.

फूड प्लाझा, रिफ्रेशमेंट रूम आणि ‘जन आहार’वर परिणाम-
आयआरसीटीसीने स्पष्ट केले आहे की हे निर्देश ट्रेनमधील केटरिंग सेवेसाठी नसून रेल्वे स्थानकांवरील दुकानांसाठी लागू आहेत. गॅसची कमतरता असल्यास स्टॉल्सना त्यांच्या कामकाजात बदल करावे लागतील. एलपीजी वापर पूर्णपणे थांबवावा लागल्यास पर्यायी व्यवस्था केल्याची माहिती विभागाला देणे बंधनकारक राहणार आहे.

हा नियम रेल्वे स्थानकांवरील फूड प्लाझा, रिफ्रेशमेंट रूम तसेच ‘जन आहार’ आउटलेट्ससाठी लागू करण्यात आला आहे.

ट्रेनमधील जेवणावरही परिणाम होण्याची शक्यता-
दरम्यान, ट्रेनमधील पॅन्ट्री कारमध्ये मुख्यत्वे अन्न गरम करून प्रवाशांना दिले जाते आणि सुरक्षा कारणास्तव तेथे एलपीजी सिलिंडर ठेवले जात नाहीत. मात्र स्टेशनवरील बेस किचनमध्ये एलपीजीची कमतरता असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी जेवण तयार करणे अवघड होत आहे.

यामुळे काही गाड्यांमध्ये शिजवलेले जेवण देण्याची सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे. ज्या प्रवाशांनी तिकिटे बुक करताना आधीच जेवणासाठी पैसे भरले आहेत, त्यांना परतफेड करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची तयारीही केली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement