Published On : Mon, Apr 23rd, 2018

निवडणूक आयोगाने केल्या महाराष्ट्र विधान परिषद, आंध्र प्रदेश निवडणुकीच्या तारखा जाहीर

Advertisement

election-commission_1501568085

नवी दिल्ली: भारतीय निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र विधान परिषद आणि आंध्र प्रदेशच्या पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या दोन्ही पोटनिवडणुका २१ मे रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत होणार आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेतील ६ जागा अनुक्रमे ३१ मे आणि २१ जून रोजी रिक्त होणार आहेत.

भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथून अनिल दत्तात्रेय तटकरे यांचा कार्यकाळ ३१ मे रोजी संपत आहे. नाशिकच्या जयवंतराव पुंडलिकराव जाधव, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली येथील मितेश बांगडीया, परभणी-हिंगोली येथील दुरानी अब्दुल्ला खान, अमरावतीमधील प्रवीण रामचंद्रजी पोटे आणि उस्मानाबाद-लातूर-बीडचे दिलीपराव दगडोजीराव देशमुख यांचा कार्यकाळ २१ जून रोजी संपणार आहे.

Gold Rate
31 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,34,100/-
Gold 22 KT ₹ 1,24,700 /-
Silver/Kg ₹ 2,38,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आंध्र प्रदेशमधील चित्तूर स्थानिक अधिकारी मतदारसंघातील गल्ली मुद्दूकृष्णनमा नायडू यांचे ७ फेब्रुवारी रोजी निधन झाले होते. त्यामुळे येथे पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकाप्रमाणे, अधिसूचना जारी करण्याची तारीख २६ एप्रिल असेल तर अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ मे असेल. अर्जाची छाननी ४ मे रोजी होईल. अर्ज मागे घ्यायची तारीख ७ मे आहे. २९ मे रोजी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईल असे आयोगााने सांगितले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement