Published On : Thu, Jul 23rd, 2015

गोंदिया : भुकंपाने हादरला गोंदिया जिल्हा

  • भुकपांच्या भितीने नागरिक घराबाहेर
  • धरतीकंपासह विमानाच्या आवाजाप्रणाणे आले अनुभव
  • गोंदियासह बालाघाट आणि भंडारा जिल्ह्यातही भुकंप
  • जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनीही घटनेला दिला दुजोरा
  • या प्रकारचा भुकंप ही तर धोक्याची घंटा
  • नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा

Earthquake in Gondia (2)
गोंदिया।
भूकंपाच्या दृष्टीने सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या विदर्भातील गोंदिया जिल्ह्याला आज रात्री 8 वाजून 5 मिनिटांनी भूकंपाचे हादरे बसले. नागरिकांनी भूकंपाचे वेळी विमानाची घरघरप्रमाणे आवाजही झाल्याचे सांगितले.

सकाळपासूनच रिमझिम पावसाने गोंदियात सुरु केली. त्यामुळे शेतकरी सुखावलेला आहे. असे असताना गोंदिया जिल्ह्याला अचानक सायकांळी 8.05 वाजता आलेल्या भुकपांच्या झटक्याने पुर्ण गोंदिया जिल्हा हादरला गेला. गोंदिया शहराला दोनदा भुकपांचा धक्का बसला.पहिला धक्का हा 8.05 ला तर दुसरा धक्का हा 8.07 ला बसला आहे. आमगाव तालुक्यात 8.08 मिनिटांनी गेल्या काही वर्षानंतर आलेला हा भुकपांचा सर्वात मोठा धक्का आहे.गोंदिया शहरातील नागरिक घराबाहेर पडले. ग्रामीण भागतूनही भुकंप अनुभवल्याच्या बातम्या भ्रमणध्वनीवरून प्राप्त होत आहेत. गोंदिया जिल्ह्यात घरांच्या भिंतींनाही तडे गेल्याचे वृत्त आहे. गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात हा झटका नागरिकांनी अनुभवला.

देवरी तालुक्यातील मुल्ला,तिरोडा तालुक्यातील बरबसपुरा, मुंडीकोटा, गोरेगाव तालुक्यातील दवडीपार,गोरेगाव, सालेकसासह आमगाव तालुक्याला सुध्दा मोठा धक्का बसल्याची माहिती तेथील सुत्रांनी दिली. आमगाव, मुल्ला सह अनेक ठिकाणी मोठमोठी घरे व इमारती हलल्याचे वृत्त आहे. नागरिकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, भुंकपाचे हादरे बसत असताना विमानाच्या आवाजाप्रमाणे प्रचंड आवाजही झाला.

Earthquake in Gondia (1)
दरम्यान गोंदिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षाशेजारी असलेल्या सभागृहात आज सकाळपासूनच मुकाअ दिलीप गावडे हे सर्व विभागप्रमुख, बीडीओ आणि अधिकारी यांच्यासोबत समन्वय समितीच्या बैठकीत व्यस्त होते.भुकपांचा धक्का बसला त्यावेळी सुध्दा बैठक सुरु होती. भुकपांचा धक्का बसताच ही बैठक रद्द करुन सर्व अधिकारी व विभागप्रमुख सभागृह सोडून इमारतीच्या बाहेर पडले.

या भागात भूकंप येणे ही तर धोक्याची घंटा- जिल्हाधिकारी सूर्यवंशी
जिल्हाधिकारी आपल्या कार्यालयात कामात व्यस्त असताना त्यांच्या ही घटना लक्षात येताच त्यांनी कर्मचाऱ्यांना तत्काळ कार्यालय सोडण्यास सांगितले. यासंदर्भात ते लगतच्या बालाघाट, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हाप्रशासनाच्या संपर्कात आहेत. त्यांनी लगतच्या बालाघाट आणि भंडारा जिल्ह्यातून य़ा घटनेला दुजोरा मिळाल्याचे सांगितले.

सूर्यवंशी यांच्या माहितीप्रमाणे, हा प्रदेश हा भूकंपप्रवण क्षेत्रात मोडत नाही. त्यामुळे ही भविष्यात धोक्याची घंटा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यादृष्टीने नागरिकांनी सावध असले पाहिजे असेही ते म्हणाले.