Published On : Mon, Sep 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नंदनवन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; वाहनचोराच्या मुसक्या आवळल्या

ई-रिक्षा, अ‍ॅक्टिव्हा आणि दुचाकीसह ५.४० लाखांचा मुद्देमाल जप्त; सहा गुन्ह्यांचा छडा
Advertisement

नंदनवन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; वाहनचोराच्या मुसक्या आवळल्या

नागपूर टुडे – नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या ई-रिक्षाचा तपास करताना पोलिसांनी एका संशयित वाहनचोराला अटक करून त्याच्याकडून तब्बल ५ लाख ४० हजार रुपये किमतीची सहा वाहने जप्त केली. राहुल उमाकांत ईटनकर (वय ३१, रा. दर्शन कॉलनी, सरकारी दवाखान्याजवळ, गजानन मंदिर परिसर, नंदनवन, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खरबी येथील रहिवासी राकेश रामभाऊजी ठाकरे यांनी त्यांची ई-रिक्षा क्रमांक एमएच-४९/बीएम-५५१२ केडीके कॉलेज रोडवरील भगवती इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोर उभी केली होती. ६ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० ते २ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने ही ई-रिक्षा चोरून नेली. याप्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Gold Rate
Sept 07 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,33,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गुन्हा दाखल होताच नंदनवन पोलिसांच्या तपास पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्याचवेळी पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक व्यक्ती संघर्षनगर चौक परिसरात ई-रिक्षा विक्रीसाठी घेऊन आला आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संघर्षनगर चौकात सापळा रचून राहुल ईटनकर याला ई-रिक्षासह ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने सदर ई-रिक्षा केडीके कॉलेज रोडवरील भगवती इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोरून चोरल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

Advertisement

पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी काही वाहनचोरीच्या गुन्ह्यांची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून तीन ई-रिक्षा, दोन अ‍ॅक्टिव्हा आणि एक हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल अशी सहा वाहने जप्त केली.

जप्त वाहनांमध्ये एमएच-४९/बीएम-५५१२ क्रमांकाची ई-रिक्षा (किंमत १.७० लाख रुपये), एमएच-४९/बीएच-८७२४ क्रमांकाची अ‍ॅक्टिव्हा (७० हजार), एमएच-४९/बीएम-७९४५ क्रमांकाची ई-रिक्षा (८० हजार), एमएच-४०/बीएक्स-७१७९ क्रमांकाची अ‍ॅक्टिव्हा (७० हजार), एमएच-२७/डीएस-७१७६ क्रमांकाची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस (७० हजार) आणि एमएच-४९/बीएम-३१४१ क्रमांकाची हिरव्या रंगाची ई-रिक्षा (८० हजार) यांचा समावेश आहे.

नंदनवन पोलिसांनी केलेल्या तपासात वाहनचोरीचे एकूण सहा गुन्हे उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये नंदनवन पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ४०१/२०२६, ४०२/२०२६, २९६/२०२६, ३८५/२०२६ तसेच आणखी एक गुन्हा आणि गणेशपेठ पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याचा समावेश आहे. हे सर्व गुन्हे भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त रश्मिता राव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने, पोलीस उपनिरीक्षक संतोषकुमार रामलोड, पोलीस हवालदार दिनेश जुगनाहाके, पोलीस शिपाई प्रविण मरापे, राहुल खळतकर, सोमेश्वर घुगल आणि महिला पोलीस हवालदार स्वाती कुमरे यांनी सहभाग घेतला.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.