Published On : Mon, Nov 12th, 2018

परम शांती मित्र परिवार व्दारे दिवाळी मिलन संपन्न

कन्हान : – परम शांती मित्र परिवार व्दारे गहुहिवरा रोड सत्संग चौक येथे वृक्षारोपण करून व एकमेकांना दिवाळी च्या शुभेच्छा देऊन दिवाळी मिलन कार्यक्रम साजरा करण्यात आला .

दिवाळी मिलन कार्यक्रमाची अध्यक्षता डॉ श्रीकृष्ण जामोदकर तर प्रमुख अतिथी मा. किशोर बेलसरे , नगरसेवक राजेंद्र शेदंरे , प्रल्हाद रावत यांच्या उपस्थितीत परिसरात वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . परम शांती मित्र परिवाराचे व्यवस्थापक व प्रवचनकर्ता गोविंद धारपिंडे यांनी सांगितले की आत्म्याची शुद्धता करिता एक दुस-याची मदत करणे सर्वात चांगला उपाय आहे . यामुळे नेहमी मन प्रसन्न राहते .

कु नंदनी डहाके व कु सरवरी लुहुरे ने गीत और नृत्य सादर करून अतिथीचे स्वागत केले . चौबे मँडम आणि नत्थूजी चरडे यांनी सुंदर भजन गायन केले. उपस्थित सर्वानी एक दुस-या वर फुलांचा वर्षाव करून गळा भेट घेऊन दिवाळी च्या शुभेच्छा दिल्या .

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रभाकर हुड यांनी तर आभार प्रदर्शन अशोक घारड यांनी व्यकत केले . कार्यक्रमास रंगराव ठाकरे , प्रभाकर डोंगरे , वसंत खेरगडे , धनराज शेंडे, शिवशंकर कडु, विनायक धोटे,मनोहर धोटे,संतोष माहुरे, श्यामराव डहाके ,अन्ना के शेट्टी, मनोहर लुहुरे, विजय बारके, आनंद रावत, गुलाब नेवारे, नत्थू झेलपुरे, कुलदीप राणा सह मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थितीत होते .