Published On : Mon, Nov 12th, 2018

श्री साई प्रसाद कॉलेज ऑफ आर्टस् सालवा येथे रक्तदान शिबिर संपन्न

सालवा : – श्री साई प्रसाद कॉलेज ऑफ आर्टस् सालवा,येथे स्व.गोपाल(मोनू) विजयराव काठाळकर यांच्या जयंती निमित्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले .या शिबिराचे उदघाटन श्री साई सेवा शिक्षण मंडळ रामटेक चे सचिव श्री विजयराव कठाळकर यांच्या हस्ते झाले .मंचावर प्रमुख मार्गदर्शक साईनाथ ब्लड बँक चे संचालक डॉ. गणेश खंडेलवाल श्री साई सेवा शिक्षण मंडळ रामटेक चे सदस्य श्री प्रशांत धर्माडे ,सुष्मीता काठाळकर,श्री साई प्रसाद कॉलेज ऑफ आर्टस् च्या प्राचार्या सौ डॉ सुप्रिया रा पेंढारी ,ग्रामीण विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राजेश मोटघरे उपस्थित होते.

डॉ.खंडेलवाल यांनी विद्यार्थाना मानवी शरीरात रक्ताचे महत्व ,रक्ता अभावी होणारी जीवित हानी,त्यासाठी रक्तदानाचे महत्व ,रक्तदाना ची प्रक्रिया यावर विस्तृत मार्गदर्शन केले.तसेच श्री विजयराव काठाळकर यांनी त्यांच्या मुलाचे अवयव दान करून जो संदेश समाजास दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानले .महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांनी रक्तदान करण्यात त्यांचे योगदान केले.

या कार्यक्रमाचे यशशवी आयोजन करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा वानखेडे , प्रा.धोटे,रामेश्वर नागपुरे , नितीन कारेमोरे,पंकज वांढरे,डीमु महल्ले, खुशाल शेंडे,यांनी सक्रिय सहकार्य केले.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन लक्ष्मीकांत बांते यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.पेंढारी यांनी केले.