Published On : Tue, Jul 31st, 2018

२४ तासांचे पेंच २ जलशुद्धीकरण केंद्राचे शटडाऊन १ ऑगस्ट ते २ ऑगस्ट दरम्यान (सकाळी १० ते सकाळी १०)

नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून ठेवण्याची विनंती
शटडाऊन काळात बाधित भागांना टँकरद्वारे पाणीपुरवठाही शक्य नाही

नागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी संयुक्तपणे पेंच २ जलशुद्धीकरण केंद्र येथे २४ तासांचे शटडाऊन घेण्याचे ठरवले आहे. हे शटडाऊन १ ऑगस्ट सकाळी १० ते २ ऑगस्ट सकाळी १० दरम्यान चालेल.

Advertisement

या शटडाऊन काळात पेंच २ येथे खालील कामे करण्यात येतील:
1. ६ रॅपिड सँड बेड फिल्टर्सचे इनलेट वॉटर गेट्स बदलण्यात येणार
2. या फिल्टर बेड्सच्या इनलेट व आऊटलेट गेट्सच्या गिअर असेम्ब्लीज शिफ्ट करणार व अधिक चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी अलाईन करणार
3. हाय टेन्शन ११ केव्हीए इलेक्ट्रिकल पॅनेलचे मेंटेनन्सचे काम
4. डिलेव्हरी मेन सर्ज व्हेसलचे लेव्हल गॉज बदलणार
5. डिलेव्हरी लाईन्सवरील दोन एअर व्हॉल्वचे ओव्हरहॉलिंग
6. बॅलेन्सिंग टँकचे निरीक्षण व किरकोळ सिव्हील कामे करण्यात येणार.

या काळात लक्ष्मी नगर झोन (गायत्री नगर, प्रताप नगर, खामला, लक्ष्मी नगर जुने, टाकळी सीम हे जलकुंभ व जयताळा संप), धरमपेठ झोन (दाभा, वाडी, सेमिनरी हिल्स, राम नगर, हे जलकुंभ व रायफल आणि फुटाळा लाईन्स), गांधीबाग झोन (सीताबर्डी फोर्ट १ व २, खदान/बोरियापुरा हे जलकुंभ व बोरियापुरा फीडर मेन), मंगळवारी झोनचे काही भाग (गिट्टीखदान, सेमिनरी हिल्स जलकुंभ) व हनुमान नगर झोन (चिंचभुवन जलकुंभ) येथील काही भागांना पाणीपुरवठा होणार नाही किंवा मर्यादित पाणीपुरवठा होईल.

टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नसल्याने नागरिकांनी आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा.

खालील भागांचा पाणीपुरवठा बाधित राहील:
हनुमान नगर झोन:
चिंचभुवन जलकुंभ: नरेंद्र नगर भाग, बोरकुटे लेआऊट, म्हस्के लेआऊट, म्हाडा कॉलोनी, मनीष नगर भाग, जयदुर्गा सोसायटी (१ ते ६), शिल्पा सोसायटी (१ ते ४), नगर विकास सोसायटी, शाम नगर, सुरज सोसायटी, साई कृपा सोसायटी, कन्नमवर नगर, इंगोले नगर, PMG सोसायटी, मधुबन सोसायटी

धरमपेठ झोन:
राम नगर जलकुंभ: गोकुळपेठ, राम नगर, मरारटोली, तेलंगखेडी, टिळक नगर, भरत नगर, हिंदुस्तान कॉलोनी, वर्मा लेआउट, अंबाझरी लेआऊट, समता लेआऊट, यशवंत नगर, हिल टॉप, अंबाझरी स्लम, पांढराबोडी, संजय नगर, ट्रस्ट लेआऊट, मुंजे बाबा स्लम, ई.

रायफल लाईन: सिव्हील लाईन्स, RTO कॉलोनी, धरमपेठ ९ गल्ली, गडगा, आंबेडकर नगर, रामदासपेठ, काचीपुरा, ई.

फुटाळा लाईन: सिव्हील लाईन्स, दामोदर कॉलोनी, मरियम नगर, VCA स्टेडियम जवळचा भाग, विधान भवन, ई.

सेमिनरी हिल्स जलकुंभावरील सुरेन्द्रगढ सप्लाय: सुरेन्द्रगढ , मानवता नगर, जय बजरंग सोसायटी, सरोज नगर, मनोहर विहार, भीमटेकडी, धम्म नगर, राजीव नगर, गोंड मोहल्ला, शास्त्री नगर, MES संप, MECL, CPWD, ई.

लक्ष्मी नगर झोन:
लक्ष्मी नगर जलकुंभ, गायत्री नगर जलकुंभ, प्रताप नगर जलकुंभ, खामला जलकुंभ, टाकळी सिम जलकुंभ आणि जयताळा भाग (जयताळा व रमाबाई आंबेडकर नगर)

गांधीबाग झोन:
सीताबर्डी फोर्ट जलकुंभ, बोरियापुरा/खदान जलकुंभ, किल्ला महाल जलकुंभ

मंगळवारी झोन:
गिट्टीखदान जलकुंभ: बापू नगर, गीता नगर, बाबा फरीद नगर, गायत्री नगर, झिंगाबाई टाकळी वस्ती, साईबाबा कॉलोनी, फरस, डोये लेआऊट, मानकापूर, ताज नगर, रतन नगर, P&T कॉलोनी, सदिकाबाद कॉलोनी, जाफर नगर, अनंत नगर, भूपेश नगर, महेश नगर, बोरगाव रोड, पटेल नगर, उत्थान नगर, पलोटी नगर, अवस्थी नगर.

सेमिनरी हिल्स जुने जलकुंभ: CPWD क्वार्टर, काटोल रोड, पोलीस लाईन टाकळी, गड्डीगोदाम, खलासी लाईन, मोहन नगर

मात्र, पेंच २ येथील या शटडाऊन दरम्यान पेंच १, ३, ४, कन्हान हे सर्व जलशुद्धीकरण केंद्र पूर्णतया कार्यरत राहतील. त्यामुळे इतर कुठल्याही भागाचा पाणीपुरवठा बाधित राहणार नाही.

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement