Published On : Fri, Jun 15th, 2018

दुषित पाणीपुरवठ्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी नगरपरीषदेला ठोकले कूलूप

कन्हान : – मागील कित्येक दिवसां पासून स्वामी विवेकानंद नगर ,पिपरी येथील संपूर्ण परीसरात दुर्गंधीयुक्त दुषित पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जात आहे . संपूर्ण परिसरात रोगराई पसरलेली आहे.परिस्थीती इतकी गंभीर आहे की जिवीत हाणी होवु शकते. अनेकदा निवेदन व तोंडी तक्रार करून ही नगरपरीषद मधील माजलेल्या सत्ता पक्ष , मुजोर अधिकारी, कर्मचारी कुणाचेही ऐकायला तयार नाही, कन्हान-पिपरी शहरात ह्यांचा मनमानी कारभारा मुळे येथील नागरीकांचे जिवन जगने मानसिक व शारीरिक दुष्टया अतिशय त्रासदायक झाले आहे.

दुषित पिण्याच्या पाणी पुरवठयामुळे संपूर्ण परिसरात संसर्गजन्य रोगाची लागण होत असल्याने आज कन्हान-पिपरी शहरातील ग्रामस्थ नळाचे दुर्गंधीयुक्त दुषित पिण्याचे पाणी बाटल व बादली मध्ये घेवुन नगरपरीषद कार्यालयात ज्वलंत समस्येबाबत जवाब विचारणा करण्याकरीता गेले असता तेथे नगराध्यक्ष ,अधिकारी ह्या पैकी कुणीही हजर नव्हते .

Gold Rate
13 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,800 /-
Gold 22 KT ₹ 1,02,100 /-
Silver/Kg ₹ 1,29,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शहरातील संतप्त, भडकलेल्या ग्रामस्थानी बेवारस नगरपरिषदला कुलुप लावून शासकीय कामकाज बंद पाडले. संतप्त ग्रामस्थांची परिस्थीती पाहता तेथे पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाचरण( बोलविण्यात) करण्यात आला व काही वेळानंतर पोलीसाच्या पुढाकाराने भडकलेल्या ग्रामस्थांशी चर्चा करण्या करीता नगरपरिषद उपाध्यक्ष डॉ. मनोहर पाठक व पाणी पुरवठा सभापती अजय लोंढे नगरपरीषद कार्यालयात आले व ग्रामस्थाशी चर्चा करून तात्काळ स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यावर २४ तासाचा आत जर स्वच्छ पाणी पुरवठा केला नाही तर उग्र जनआंदोलन करण्यात येईल.

असा ग्रामस्थांनी त्यांना निवेदन देऊन ईशारा दिला . याप्रसंगी नगरपरिषद उपाध्यक्ष डॉ. मनोहर पाठक, पाणी पुरवठा सभापती अजय लोंढे, नगरसेवक राजेंद्र शेंदरे , विरोधीपक्ष नगरसेवक राजेश यादव, पोलिस निरीक्षक चंद्रकांत काळे , उपनिरीक्षक धवड , राजेंद्र पाली , पत्रकार मोतीराम रहाटे, दिनेश नानवटकर तसेच ग्रामस्थ सतिश साळवी, युवा समाजसेवक प्रशांत बाजीराव मसार , प्रमोद बांते,दिलीप बावणे, जिवन ठवकर , सचिन साळवी,चिराग तिवस्कर, देवेंन्द्र बैस, उमेश कठाने, फैयाज खान, दिपक तिवाडे, गंगाधर चिखले,आकिब सिद्धीकी, राजु गणोरकर, बंटी हेटे, कुणाल आगुटलेवार व ग्रामस्थ उपस्थीत होते.

Advertisement
Advertisement