Published On : Fri, Sep 8th, 2017

महावितरणच्या विशेष मदत कक्षामुळे ग्राहकांना तत्परतेने नवीन वीज जोडणी

Advertisement

नागपूर: महावितरणच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या विशेष मदत कक्षामुळे राज्यातील ग्राहकांना तत्परतेने नवीन वीज जोडणी मिळत असून घरपोच सेवा देण्याच्या उपक्रमालाही ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ग्राहकांना नवीन वीज जोडणीसाठी तत्परतेने आणि घरपोच सेवा मिळावी यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री संजीवकुमार यांच्या निर्देशानुसार मुंबई येथील मुख्यालयात विशेष मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. या कक्षात 022 -26478989 व 022- 2647889वा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यानुसार संबंधित ग्राहकाचे नाव, मोबाईल क्रमांक व घरचा पत्ता घेवून ही माहिती संबंधित उपविभागाकडे देण्यात येते.

त्यानंतर या उपविभागातील कर्मचारी ग्राहकांच्या घरी जावून नवीन वीज जोडणीसाठी प्रक्रिया पूर्ण करीत आहेत.9 या दुरध्वनी क्रमांकावर ग्राहकाने नवीन वीज जोडणी, नावात बदल यासाठी संपर्क साधल्यास कक्षाच्या वतीने या सुविधांसाठी ग्राहकांना तत्परतेने से विशेष मदत कक्षाचा राज्यातील ग्राहकांना मोठा लाभ मिळत असून घरपोच सेवा मिळण्यासाठी या कक्षाची मोठी मदत मिळत आहे.