Published On : Tue, Mar 31st, 2020

मध्यप्रदेश सरकारने सीमा सील केल्याने गावी जाणाऱ्या कामगारांना परत पावलानी परतावे लागले

कामठी :-, मध्यप्रदेश सरकारने मध्यप्रदेशात जाणाऱ्या मार्गावरील सर्व सीमा सील केल्याने गावी परत जाणाऱ्या कामगारांना परत पावलाने नागपूर परिसरात ज्या ठिकाणी वास्तव्यास होते तिथे परत जावे लागले

मध्यप्रदेशातून काही महिन्यापूर्वी नागपुरात वाडी ,हिंगणा, पिवळी नदी ,चीच भवन ,जरीपटका परिसरात कामाच्या शोधात आलेल्या आलेल्या कामगारांना कोरोना महारोगामुळे सर्वत्र कर्फ्फु, संचारबनदी असल्यामुळे नागरिक व कामगारांना घाराबाहेर निघणे कठीण झाले आहेत कंगारांजवल असलेले सर्व। अन्नधान्य व जीवणावश्यक वस्तू संपल्यामुळे मध्यप्रदेशातून आलेले कामगार आपल्या कटुबासह साधन नसल्यामुळे नागपूर वरून पायी पायी च कामठी मार्गे शिवणी मध्यप्रदेशात जाऊ लागले आहेत प्रतिदिन हजारो कामगार गावी परतजाताना दि सून येत होते काल रविवार पासून मध्यप्रदेश सरकारने मध्यप्रदेशात जाणारे सर्व मार्ग सील केल्यामुळे महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन्ही राज्याच्या सीमेवर 2 हजाराचे वर कामगार ठाण मांडून बसले असल्यामुळे महाराष्ट्र शासन प्राशासणाची तारांबळ उडाली आहे

त्यामुळे नागपूरचे पोलीस उपायुक्त निळोतपल, तहसीलदार अरविंद हिंगे, सहाय्य पोलीस उपायुक्त राजरत्न बनसोड, नगरपरिषदे चे मुख्याधिकारी रमाकांत डाके, नवीन कामठी चे ठाणेदार संतोष बकाल, जुनी कामठी चे ठाणेदार देविदास कठाले यांनी दुपारी 5 वाजता सुमारास कामठी परीसरातून मध्यप्रदेशात जाणाऱ्या कामगारांना नवीन कामठी पोलीस ठाण्यात परिसरात थाबवून त्यांना आपनास पुढे मध्यप्रदेशात जाता येणार नाही आपण ज्या नागपूर परिसरातून आले त्या ठिकाणी परत जावे लागणार असल्याचे समजवून सांगितले 14 यप्रिल पर्यंत लॉक डाऊन असल्यामुळे आपणाला घराबाहेर निघाता येणार नाही आपल्याला अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू शासनाचे वतीने पुरविल्या जाणार असल्याचे आश्वासनं दिले


कामगारांची समजूत काढून सर्व 400 कामगारांना पोलीस बंदोबस्तात पोलीस वाहनाने नागपुरात त्यांच्या परिसरात सोडून दिले त्यामुळे अनेक कामगारांच्या गावी जाण्याच्या आशेवर पाणी फिरल्याने अनेकांचा हीरमोड झाला , पोलीस उपायुक्त निळोतपल, तहसीलदार अरविंद हिंगे यांनी कामठी परिसरात येणारे सर्व मार्ग सील करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले असून एकही कामगार किंवा नागरिक कामठी परिसरात आगमन होणार नाहीं याची दखल घेण्याचे आदेश दोन्ही ठाण्यातील अधिकाऱयांना दिले आहेत

संदीप कांबळे कामठी