Published On : Tue, Mar 31st, 2020

गरीब मजुरांवर रसायनांची फवारणी हे दृश्य अमानवी, क्रूर आणि निंदनीय – शरद पवार

ट्वीटच्या माध्यमातून शरद पवारांनी घटनेचा केला निषेध…

मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये घरी परतणाऱ्या त्या गरीब मजुरांवर रसायनांची फवारणी करण्यात आली त्यात त्यांचा काय दोष? असा संतप्त सवाल करतानाच हे दृश्य अमानवी, क्रूर आणि निंदनीय आहे. या भयंकर घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र निषेध केला आहे.

रोजगाराला वंचित स्थलांतरित मजुरांवर अशा प्रकारे रासायनिक फवारणी करून कोरोना विषाणूच्या शुद्धिकरणाचे प्रयोग उत्तर प्रदेशमध्ये झाले हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर फिरत आहे.


हा व्हिडीओ पाहिल्यानंतर शरद पवार यांनी ट्वीट करून आपला संताप व्यक्त केला आहे.