Published On : Wed, Apr 4th, 2018

‘जेईई-मेन्स’मुळे नागपूर विद्यापीठ परीक्षांच्या तारखांमध्ये पुन्हा बदल

Nagpur University
नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नुकत्याच नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यासाठी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाचे कारण देण्यात आले होते. त्यामुळे २४ मार्चला दीक्षांत समारंभाच्या दिवशी आयोजित सर्व परीक्षा ८ एप्रिल रोजी होणार होत्या.

परंतु आता ८ एप्रिलला केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) द्वारे आयोजित अभियांत्रिकी प्रवेशपरीक्षा ‘जेईई-मेन्स’ होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक बदलले असून आता ९, १०, ११,१३ आणि १५ तारखेला या परीक्षा घेण्यात येतील. ही माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपडेट करण्यात आली आहे.

यामध्ये एकूण ७३ विषयांच्या परीक्षा ९ एप्रिलला होणार असून २८ विषयांच्या परीक्षा १५ एप्रिल रोजी घेतल्या जातील. सीबीएसई संलग्नित शाळांसोबतच विद्यापीठाच्या काही परीक्षा केंद्रांचा सुद्धा समावेश असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.