Published On : Tue, Apr 2nd, 2019

चारपदरी सिमेंट रस्ता निर्माण कामा मुळे धुळीचे व अंधाराचे साम्राज्य

कन्हान : – ऑटोमोटिव्ह चौक नागपुर ते टेकाडी बस स्टाप पर्यंत चारपदरी सिमेंट रस्ता निर्माण काम मंद गतीने होत असल्याने निर्माणधिन कामामुळे मोठय़ा प्रमाणात धुळीचे प्रदुषण होत आहे . तसेच रस्त्यावर विधृत दिवाबत्ती व्यवस्था लावण्यात न आल्याने या मंद गतीच्या निर्माणधिन कामामुळे परिसरातील नागरिकांना व प्रवाशांना धुळीचे व अंधाराच्या साम्राज्याने दुष परिणाम भोगावे लागत असुन सुध्दा संबंधित विभागाचे अधिकारी मुंग गिळुन गप्प का ? हा प्रश्न सर्वसामान्य लोकांचा चर्चेचा विषय बनला आहे .

महामार्ग क्र.४४ (जुना क्र ७ ) वरील ऑटोमोटिव्ह चौक नागपुर ते टेकाडी बस स्टाप पर्यंत चारपदरी सिमेंट, मार्गाचे १८ कि मी लांबीच्या निर्माण कामाचा २५३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे काम मंदगतीने सुरू असुन परिसरातील नागरिकांना व प्रवाशांना धुळीच्या व अंधारांच्या साम्राज्याने भंयकर त्रास सहन करावा लागत असुन संबंधित निर्माण करण्या-या कंपनीच्या निष्काळजीने होणा-या अपघातात अपंगत्व किंवा निद्रोष लोकांनचा बळी घेत आहे.

या निर्माणधिन रस्ता कामा मुळे माती, सिमेंट, रेती , राखळ, बारीक गिट्टीचे वाहनाच्या वर्दळीने मोठय़ा प्रमाणात वायु प्रदुषणाने अपघात व सबंधित आजाराचा लोकांना सामना करावा लागत आहे . तरी सुध्दा महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अधिकारी जाणीव पुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे तसेच रस्त्यावर विधुत दिवाबत्ती ची व्यवस्था करण्यात न आल्याने रात्रीच्या वेळी कन्हान ते टेकाडी बस स्टाप अंधारांचे साम्राज्य निर्माण झाल्याने आणि रस्ता दुभाजक, नाली बांधकाम पूर्ण करण्यात न आल्याने परिसरातील नागरिकांना व प्रवाशांना अपघाताचे दुषपरिणाम भोगावे लागत आहे.

या मोठया प्रमाणात धुळीच्या प्रदुषणाने व अंधाराच्या साम्राज्याने अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढ होत आहे. यास्तव संबंधित विभागाच्या अधिकारी यांनी त्वरित कारवाई करून निर्माणधिन कामात पाण्याचा वापर करून धुळीचे प्रदुषण थांबविण्यात यावे , लवकरात लवकर विधुत दिवाबत्ती लावण्यात येऊन चारपदरी सिमेंट रस्ता जलदगतीने पुर्ण करण्यात यावे . अशी मागणी जोर धरू लागली आहे .