Published On : Sat, Mar 28th, 2020

बॅकफिडमुळे गणेशपेठला अखंडित वीजपुरवठा शक्य

नागपूर: शहरातील वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे गणेश पेठ परिसरातील सुमारे १५ हजार वीज ग्राहकांना सध्याच्या “लॉक डाऊन ” परिस्थितीत विना व्यत्यय वीज पुरवठा करणे शक्य झाले.

बुधवारी सायंकाळी आलेल्या पावसामुळे या परिसरातील भूमिगत वाहिनीत बिघाड झाला होता.यावेळी महावितरणकडून तात्काळ पावले उचलण्यात आली.दुसर्‍या वीज वाहिनीवरून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

Gold Rate
27 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,22,200 /-
Gold 22 KT ₹ 1,13,600 /-
Silver/Kg ₹ 1,51,400/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कोरोना विषाणूंमुळे सर्व काही बंद असताना महावितरणच्या वतीने वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करण्यात आला.

मॉडेल मील चौक ते म्हाडा कॉलनी दरम्यान भूमिगत वाहिनीत दोन जागी बिघाड झाला आहे.यातील पहिला बिघाड शनिवारी दुपारी दुरुस्त करण्यात आला. दुसरा बिघाड हा गणेश पेठ बस स्थानक ते आग्याराम देवी मंदिर दरम्यान असलेल्या भूमिगत वाहिनीत आहे.यासाठी खोदकाम सुरू आहे. रविवारी हे काम पूर्ण होईल अशी माहिती महावितरणच्या तुळशीबाग उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रसन्न श्रीवास्तव यांनी दिली.

सध्याच्या प्रतिकुल परिस्थितीत महावितरणच्या वतीने अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वीज ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन प्रभारी मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement