Published On : Sat, Mar 28th, 2020

पालकमंत्र्यांचे जनतेला कळकळीचे आवाहन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांत वाढ

Advertisement

जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढविल्यास कारवाई पोलीस बंदोबस्त अधिक कडक करण्याचे निर्देश

पालकमंत्र्यांनी आज घरूनच माननीय मुख्यमंत्र्यांना नागपूर जिल्ह्यातील सध्यस्थितीबाबत माहिती दिली. यापूर्वी त्यांनी जिल्हा प्रशासन जसे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, मेयो व मेडिकल रुग्णालयाचे अधिष्ठाता यांचेकडून सध्यस्थितीचा आढावा घेतला. हातावर आणून पानावर खाणाऱ्या गोर-गरीब-निराधार, झोपडपट्टीतील नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंचे वितरण लवकरात लवकर सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

Gold Rate
28 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,64,400/-
Gold 22 KT ₹ 1,52,900 /-
Silver/Kg ₹ 3,72,000 /-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

संचारबंदी, लॉकडाऊनच्या काळात नागपुरात जीवनावश्यक वस्तू व सेवा सुरुळीतपणे सुरु आहेत. मात्र, या कठीण काळात कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंचे जसे किराणा,धान्य, भाजीपाला यांची भाव वाढ होऊ नये, जनतेला रास्त दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने संबंधित व्यापारी-दुकानदारांना तात्काळ सूचना द्याव्या तथा संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश आज पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी जिल्हाधिकारी नागपूर यांना दिले.

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी जिल्हा प्रशासनाचे युद्धस्तरीय काम सुरु आहे. नागपुरात पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या आता चार वरून अकरा पर्यंत वाढली आहे. या पार्श्वभूमीवर येणारे दहा दिवस अतिशय महत्वाचे/कठीण आणि निर्णायक राहणार आहेत. त्यामुळे जनतेने अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी घरीच राहावे, शांतता बाळगावी, संयम ठेवावा, अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. सामाजिक अंतराचे (सोशल डिस्टंस) चे पालन करावे असे पालकमंत्र्यांनी कळकळीचे आवाहन केले आहे.

नागपूरातील बहुतांश जनता, प्रशासनाच्या सूचनांचे नियमित पालन आणि सहकार्य करीत आहे ते निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. मात्र, काही लोक अद्यापही प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून “मला काही होत नाही” या आविर्भावात विनाकारण रस्त्यावर फिरतांना दिसत आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, पोलीस विभागाने अधिक कडक बंदोबस्त करावा अश्या सूचना आज पालकमंत्री यांनी पोलीस आयुक्त नागपूर शहर आणि पोलीस अधीक्षक (नागपूर ग्रामीण) यांना दिल्या आहेत. नागपूरच्या जनतेने अश्या या कठीण परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करावे, घरीच राहावे असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement