Published On : Wed, Dec 19th, 2018

परिवहन अधिका-यांच्या मनमानीमुळे ट्रांसपोर्ट व्यवसाय संकटात,व्यापारी त्रस्त

Advertisement

राष्ट्रवादी ग्रेस पक्ष नागपुर शहर व्यापारी आघाडीचे अध्यक्ष स्वप्निल अहिरकर यांच्या नेतृत्वात मा.प्रादेशीक परिवहन अधिकारी (आर.टी.ओ.)यांना आपल्या मागण्याचे निवेदन सादर करुन ट्रांसपोर्ट व्यवसायींच्या अडचणी बाबत चर्चा करण्यात आली.

नागपुर शहर ही मेट्रोसिटी होत आहे शहरात दररोज शेकडो ट्रक्स येतात एम.एच ४९ च्या नियम बदलावामुळे यांना आर.टी.ओ कडुन फिटनेस प्रमाणपत्र प्राप्त करणे जरुरी आहे या करीता एक ते तिन आठवडे अगोदर सुचीत करावे लागते , मात्र परिवहन अधिका-यांच्या कामचुकारपणामुळे दिवसाकाठी फक्त चार पाच जडवाहनांना फिटनेस प्रमाणपत्र दिल्या जाते या करीता अधिका-यांकडुन अतिरीक्त पैशाची सतत मागणी होत असते.

या कारणामुळे व फिटनेस प्रमाणपत्र वेळेवर न मिळाल्यामुळे अनेक ट्रक एक ते तिन आठवडे एकाच जागी उभे राहुन वाहतुक व्यवस्था प्रभावीत होऊन पेट्रोल डिझेलची नासाडी होत आहे..व्यापा-यांच अतोनात नुकसान होत आहे .याला काही भ्रष्ट अधिकारी कारणीभुत असुन कारवाईची मागणी केली आहे.

संपुर्ण कागदपत्रे असुनही टुव्हिलर रजिस्ट्रेशनसाठी २०० ते ३०० रुपयाची अतिरीक्त लाच मागण्यात येते आर.टी.ओ.अधिकारी जडवाहनधारकांशी साठगाठ व अवैद्द वसुली करुन शहरात या ट्रकांना परवानगीशिवाय प्रवेश देण्यात येतो या अवैद्द वसुली मुळे ओव्हरलोडींग वाहन शहरात धावत आहे,वाहतुक व्यवस्था कोडमडली आहे शहरात ईतवारी गांधीबाग,सि.ए.रोड या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले आहे..यामुळे ट्रांसपोर्ट व्यवसायी आर्थीक संकटात सापडलाअसुन भ्रष्टअधिका-यामुळे त्रस्त झाला आहे.

याला भ्रष्ट परिवहन अधिकारी कारणीभुत असुन कारवाईची व समस्या सोडविण्याची मागणी *रा.का.पा.व्यापारी आघाडीचे अध्यक्ष स्वप्नील अहिरकर* यांनी केली आहे व १५ दिवसात समस्या न सोडविल्यास व मागण्या पुर्ण न केल्यास आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला .

शिष्टमंडळात सर्वश्री शैलेन्द्र तिवारी, सोहेब अलय,अभिषेक जोग,मृणाल साकरे,सन्नी नेहानी,अभिजीत समर्थ,संजय धापोडकर,रवि पराते,स्वप्निल खापेकर,प्रणय जांबुडकर,रुद्र धाकडे,राजेश उत्तम,आनिल बोकडे,टायगर सुफी,अमित दुबे, राहुल वाघमारे, साहिल सहारे, अभिषेक भेले, कमलेश बागडे, आदी उपस्थीत होते.